मुंबई I वेस्ट इंडिजचा संघ अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार जेसन होल्डर याच्या नेतृत्त्वाखाली जुलैमध्ये इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्याच्या तयारीसाठी संघाने छोट्या छोट्या समूहात सरावाला सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिजचे सहाय्यक प्रशिक्षक राँडी एस्टविक आणि बारबाडोस क्रिकेट संघाच्या अन्य प्रशिक्षकांच्या देखरेखित संघ मैदानात कसून सराव करत आहे.
कोविड-१९मुळे सर्वत्र लाॅकडाऊन असल्याने खेळाडू बरेच दिवस क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहेत. बऱ्याच दिवसांनंतर संघ मैदानात उतरला आहे.
क्रेग ब्रेथवेट, शाई होप, केमार रोच, शेन डाँरिच, समर्थ ब्रूक्स आणि रेमन रीफर यांनी केनसिंगटन ओवल येथे सराव करताना दिसून आले. खेळाडू सराव करताना इतर कोणत्याही खेळाडूला मैदानात प्रवेश दिला जात नव्हता. स्टेडियमचे सर्व दरवाजे बंद करुन खेळाडू सराव करत आहेत.
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्याच्या तयारीसाठी स्थानिक सरकारने परवानगी दिली आहे. सुरक्षेच्या संबंधी तसेच सोशल डिस्टिंगसनच्या बाबतीत ज्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, त्याचे तंतोतंत पालन केले जात आहे.
वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी याबाबत माहिती देताना म्हणाले की, खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. ही चांगली गोष्ट आहे. २८ मे रोजी बोर्ड आँफ डायरेक्टर्स यांच्यासोबत टेलीकाँन्फ्रेसिंग द्वारे बैठक होणार आहे. या इंग्लंड दौऱ्याबाबत परवानगी मिळेल ही आशा त्यांनी व्यक्त केली आहे.