आॅक्टोबरमध्ये विंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक आज, मंगळवारी बीसीसीआयने जाहिर केले आहे.
या दौऱ्याला 4 आॅक्टोबरपासून राजकोट येथे पहिल्या कसोटी सामन्याने सुरुवात होईल. या दौऱ्यात भारत आणि विंडिजमध्ये 2 कसोटी, 5 वनडे आणि 3 टी20 सामने होणार आहेत. तसेच हा दौरा 11 नोव्हेंबर पर्यंत असेल.
2016 च्या टी 20 विश्वचषकानंतर पहिल्यांदाच विंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.
या दौऱ्यातील राजकोट येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर दुसरा कसोटी सामना 12 आॅक्टोबरपासून हैद्राबाद येथे होईल. या कसोटी मालिकेनंतर चार दिवसांनी म्हणजेच 21 आॅक्टोबरपासून वनडे मालिका सुरु होईल.
या वनडे मालिकेतील पाच सामन्यांपैकी तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे पुणे आणि मुंबई येथे होणार आहे. तसेच पहिले दोन सामने अनुक्रमे गुवाहाटी आणि इंदोर येथे होतील. तर 1 नोव्हेंबरला होणारा शेवटचा वनडे सामना तिरुअनंतपुरमला होईल.
याबरोबरच पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीनेही त्याआधी होणाऱ्या वनडे मालिकांकडे तयारी म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे ही वनडे मालिकाही दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
या वनडे मालिकेनंतर तीन टी20 सामन्यांची मालिका पार पडेल. हे तीन सामने अनुक्रमे कोलकता, लखनऊ आणि चेन्नई येथे होतील.
तसेच या दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी विंडिजच्या कसोटी संघाची याआधीच घोषणा झाली आहे.
भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून हा दौरा 11 सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर 15 ते 28 सप्टेंबर या काळात भारतीय संघ युएईला होणाऱ्या एशिया कपमध्ये भाग घेईल. त्यानंतर एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर संघ राजकोटला पहिला कसोटी सामना खेळणार आहे.
असा आहे विंडिजचा कसोटी संघ-
जेसन होल्डर (कर्णधार), सुनील अंबरिस, देवेंद्र बिशू, क्रेग ब्रॅथवेट, रोस्टन चेस, शेन डोवरिच, शॅनन गॅब्रिएल, जहमार हॅमिल्टन, शिमरोन हेटमेयर, शाय होप, अल्झारि जोसेफ, किमो पॉल, कयरान पॉवेल, केमार रोच, जोमेल वॉरिकन.
असे आहे विंडीजच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक-
कसोटी मालिका-
पहिली कसोटी- 4 ते 8 ऑक्टोबर (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट)
दुसरी कसोटी- 12 ते 16 ऑक्टोबर (राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद)
वनडे मालिका-
पहिला वनडे सामना- 21 ऑक्टोबर (बारसपारा स्टेडियम, गुवाहटी)
दुसरा वनडे सामना- 24 ऑक्टोबर (होळकर स्टेडियम,इंदोर)
तिसरा वनडे सामना- 27 ऑक्टोबर (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे)
चौथा वनडे सामना- 29 ऑक्टोबर (वानखेडे स्टेडियम, मुंबई)
पाचवा वनडे सामना- 1 नोव्हेंबर (ग्रिनफिल्ड स्टेडियम, तिरुअनंतपुरम)
टी20 मालिका-
पहिला टी20 सामना- 4 नोव्हेंबर (इडन गार्डन्स, कोलकाता)
दुसरा टी20 सामना- 6 नोव्हेंबर (एकाना इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, लखनऊ)
तिसरा टी20 सामना- 11 नोव्हेंबर (चेपॉक स्टेडियम, चेन्नई)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–टॉप 5: अॅलिस्टर कूकच्या नावावर आहेत हे खास विक्रम
–सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली…!!!
–‘#Thankyouchef’ आजी माजी खेळाडूंनी अॅलिस्टर कूकच्या निवृत्तीनंतर व्यक्त केल्या भावना