इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या 2019 विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑगस्टमध्ये विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या विंडीज दौऱ्यात तीन वनडे, तीन टी20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. कसोटी मालिका ही आयसीसी टेस्ट चॅम्पियशिपचा भाग असेल.
या दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.
याबद्दल बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकारीने नाव न सांगण्याच्या अटीवरुन पीटीआयला माहिती दिली आहे की ‘विराट आणि जसप्रीत यांना तीन टी20 आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येईल.’
‘विराट ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेपासून खेळत आहे आणि बुमराहच्या कामाच्या ताणाचे व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. ते कसोटी मालिकेआधी भारतीय संघात पुन्हा सामील होतील.’
विराट, बुमराह बरोबरच आणखी काही खेळाडूंनाही विंडीज दौऱ्यात विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. या विंडीज दौऱ्यात भारतीय संघ सुरुवातीला 3 ते 6 ऑगस्ट टी20 मालिका, तर 8 ते 14 ऑगस्ट वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर 22 ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
वरिष्ठ भारतीय संघाच्या आधी जूलैमध्ये भारत अ संघ विंडीजचा दौरा करणार आहे. त्यामुळे जर वरिष्ठ संघातील काही खेळाडूंना विंडीज दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली तर भारत अ संघाकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी अशा काही खेळाडूंना वरिष्ठ संघात खेळण्यासाठी संधी दिली जाऊ शकते.
असा असेल भारताचा विंडीज दौरा 2019 –
टी20 मालिका –
3 ऑगस्ट – पहिला टी20 सामना – फ्लोरीडा
4 ऑगस्ट – दुसरा टी20 सामना – फ्लोरीडा
6 ऑगस्ट – तिसरा टी20 सामना – गयाना
वनडे मालिका –
8 ऑगस्ट – पहिला वनडे – गयाना
11 ऑगस्ट – दुसरा वनडे – त्रिनिदाद
14 ऑगस्ट – तिसरा वनडे – त्रिनिदाद
कसोटी मालिका –
22 ते 26 ऑगस्ट – पहिली कसोटी – अँटीग्वा
30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर – दुसरा कसोटी – जमैका
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘हम तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे’: अफगाणिस्तानच्या कर्णधाराचे बांगलादेशला आव्हान
–हॅट्रिक बॉलच्या आधी धोनीने दिला होता हा सल्ला, शमीने केला खुलासा
–२०१९ विश्वचषकात खेळाडूंचे झाले नाही एवढे होतेय या व्यक्तीचे कौतुक