भारतीय कर्णधार विराट कोहलीने काल श्रीलंकेविरुद्ध असंख्य विक्रम केले. परंतु कर्णधार म्हणून त्याने एक खास विक्रम केला आहे.
विराटने श्रीलंकेत ३ कसोटी सामने जिंकले आहेत. कर्णधार म्हणून विराटचा हा दुसरा श्रीलंका दौरा आहे. यापूर्वीच्या दौऱ्यात त्याने २ कसोटी विजय मिळविले होते.
श्रीलंकेत आजपर्यँत कोणत्याही भारतीय कर्णधाराला एकपेक्षा जास्त कसोटी सामना जिंकता आलेला नाही. मोहम्मद अझरुद्दीन(४ पैकी १ विजय ३ ड्रा), सौरव गांगुली(३ पैकी १ विजय २ पराभव), एमएस धोनी(३ पैकी १ विजय १ पराभव आणि १ ड्रा), अनिल कुंबळे(३ पैकी एक विजय आणि २ पराभव), कपिल देव(३ पैकी १ पराभव आणि २ ड्रा) आणि सचिन तेंडुलकर(२ पैकी २ ड्रा) यांचे हे आहेत श्रीलंकेतील रेकॉर्डस्.
अन्य पाहुण्या कर्णधारांपैकी केवळ रिकी पॉन्टिंगला श्रीलंकेत ३ विजय मिळविता आले आहे. पॉन्टिंगने २००३-२००४ साली ३ पैकी ३ कसोटी जिंकून लंकेला व्हाईट वॉश दिला होता.
विराटला कर्णधार म्हणून मोठी संधी:
श्रीलंकेत पाहुण्या संघाचा कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम विराटच्या नावे होऊ शकतो. श्रीलंकेविरुद्ध अजून २ सामने बाकी असून सध्याची श्रीलंका संघाची अवस्था पाहता हा विक्रम आपल्या नावावर करणे विराटला नक्कीच अशक्य नाही. श्रीलंकेत विराटपेक्षा जास्त सामने केवळ श्रीलंकन कर्णधारांनी जिंकले आहेत. विराटला कुमार संगकारा आणि आटपटू यांच्या ५ कसोटी विजयाची बरोबरी करता येऊ शकते.