---Advertisement---

विस्डेनची दशकातील बेस्ट टी२० टीम जाहीर; धोनीसह या दिग्गजाचा मात्र समावेश नाही

---Advertisement---

2019 चे वर्ष आता संपत आले आहे. त्यामुळे 2010-2019 या दशकाचीही सांगता होत आहे. याचनिमित्ताने अनेकांनी दशकातील सर्वोत्तम संघ निवडले आहेत. यामध्ये विस्डेनने दशकातील सर्वोत्तम वनेड आणि कसोटी संघापाठोपाठ आता टी20 संघाचीही घोषणा केली आहे.

या सर्वोत्तम 11 जणांच्या संघात विस्डेनने विविध संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान दिले आहे.

मात्र या संघात भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि टी20मधील सर्वात यशस्वी सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा यांना स्थान दिले नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले आहे.

विस्डेनच्या या टी20 संघात सलामीवीर म्हणून ऑस्ट्रेलियाचा मर्यादीत षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंच आणि न्यूझीलंडचा फलंदाज कॉलिन मुनरो यांना स्थान दिले आहे. तसेच फिंचला विस्डेनने या दशकातील सर्वोत्तम टी20 संघाचे कर्णधारपदही दिले आहे.

या संघात तिसऱ्या क्रमांकासाठी विस्डेनने भारताचा कर्णधार विराट कोहलीची निवड केली आहे. विराट सध्या रोहितसह संयुक्तरित्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या दोघांनीही टी20मध्ये प्रत्येकी 2633 धावा केल्या आहेत.

विस्डेनने त्यांच्या दशकातील सर्वोत्तम टी20 संघात विराट पाठोपाठ चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनची निवड केली आहे.

या संघात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल, इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉस बटलर यांनाही स्थान मिळाले आहे. तसेच अफगाणिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद नबीला सातव्या क्रमांकासाठी जागा मिळाली आहे.

त्यानंतर डेव्हिड विली, राशिद खान, जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा यांना या टी20 संघात गोलंदाज म्हणून स्थान मिळाले आहे.

असा आहे विस्डेनचा या दशकातील सर्वोत्तम टी20 संघ-

ऍरॉन फिंच (कर्णधार), कॉलिन मुनरो, विराट कोहली, शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सवेल, जॉस बटलर (यष्टीरक्षक), मोहम्मद नबी, डेव्हिड विली, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---