क्रिकेट विश्वातील सर्वात प्रतिष्ठित कसोटी मालिका असलेल्या ऍशेस मालिकेतील दुसरा सामना ऍडिलेड येथे खेळला गेला. (Ashes 2021-2022) दिवस-रात्र स्वरूपाच्या या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा धावांनी पराभव केला. (AUSvENG) यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. पहिल्या डावातत शानदार शतकी खेळी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuchange) याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
ऑस्ट्रेलियाने उभारली मोठी धावसंख्या
नियमित कर्णधार पॅट कमिन्स अखेर त्याक्षणी सामन्यातून बाहेर झाल्यामुळे स्टीव्ह स्मिथ याने तब्बल चार वर्षानंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले. नाणेफेक जिंकून त्याने घेतलेला फलंदाजीचा निर्णय फलंदाजांनी सार्थ ठरवला. मार्नस लॅब्युशेनचे शतक आणि डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ व ऍलेक्स केरी यांच्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ४७३ धावांवर आपला डाव घोषित केला.
प्रत्युत्तरात, इंग्लंडसाठी कर्णधार जो रूट व डेविड मलान वगळता कोणीही फारसा संघर्ष करताना दिसून आले नाही. इंग्लंडचा पहिला डाव २३६ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्क याने ४ व नॅथन लायनने ३ बळी मिळवले.
पहिल्या डावात मोठी आघाडी मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २३० धावांवर आपला डाव घोषित केला. लॅब्युशेनने पुन्हा एकदा अर्धशतक साजरे केले. त्याला ट्रेविस हेडने साथ दिली. इंग्लंडसमोर अखेरच्या डावात विजयासाठी ४६७ धावांचे अशक्यप्राय आव्हान होते. ऑस्ट्रेलियासाठी युवा झाय रिचर्डसनने पाच बळी मिळवत इंग्लंडचा डाव १९२ गावांमध्ये गुंडाळण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यानेच इंग्लंडचा अखेरचा गडी बाद करत संघाला २७५ धावांनी मोठा विजय मिळवून दिला. दोन्ही डावात ऑस्ट्रेलियासाठी सर्वोत्तम फलंदाजी करणाऱ्या मार्नस लॅब्युशेनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतील तिसरा सामना २६ डिसेंबरपासून (बॉक्सिंग डे कसोटी) मेलबर्न येथे खेळला जाईल. (Boxing Day Test)
महत्त्वाच्या बातम्या-