---Advertisement---

रूट नॉन-स्टॉप! आक्रमक शतकासह घातली आणखी दोन विक्रमांना गवसणी

On: गुरूवार, ऑगस्ट 26, 2021 10:08 PM
joe-root
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान हेडिंग्ले येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जातोय. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने शानदार शतकी खेळी करत इंग्लंडला सामन्यात बरेच पुढे नेले. आपल्या कसोटी कारकिर्दीतील २३ व्या शतकासह रूटने इंग्लंडच्या दोन दिग्गजांची बरोबरी केली.

रूटचे शानदार शतक
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने आपले दोन्ही सलामीवीर लवकर गमावले. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार रूटने तीन वर्षानंतर संघात पदार्पण करणाऱ्या डेविड मलानसह शतकी भागीदारी केली. मलान अर्धशतक करून माघारी परतल्यानंतरही रूटने आपली आक्रमक फलंदाजी कायम ठेवली. त्याचवेळी दिवसातील तिसऱ्या सत्रात त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २३ वे शतक पूर्ण केले.

या दिग्गजांची केली बरोबरी
हेडिंग्ले या आपल्या घरच्या मैदानावर दमदार शतक झळकावत रूटने अनेक विक्रम आपल्या नावे केले. त्याने इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणार्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्याने या शतकासह केविन पीटरसनच्या २३ कसोटी शतकांची बरोबरी केली. इंग्लंडसाठी कसोटीमध्ये सर्वाधिक शतके माजी कर्णधार ऍलिस्टर कूकच्या नावे आहेत. त्याने आपल्या कारकीर्दीत ३२ कसोटी शतके झळकावलेली.
रूटने या शतकासह इंग्लंडचा कर्णधार म्हणून १२ वे कसोटी शतक ठोकले. या यादीमध्ये त्याने ग्रॅहम गूच यांना मागे सोडत कूकची बरोबरी केली.

जबरदस्त फॉर्ममध्ये आहे रूट
जो रूट भारताविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने या तीन कसोटी सामन्यांच्या पाच डावांमध्ये एक अर्धशतक व तीन शतके झळकावली आहेत. या पाच डावांमध्ये त्याने ५०० पेक्षा अधिक धावा जमविल्या असून, हेडिंग्ले कसोटीचा दुसरा डाव व उर्वरित दोन कसोटी शिल्लक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

https://mahasports.in/joe-root-completed-his-century-england-take-255-runs-lead/

हुश्श! संपला जडेजाचा बळींचा दुष्काळ, ४० गडी बाद झाल्यानंतर…

दिस इज सर जडेजा वे! अर्धशतकवीर हमीदला धाडले तंबूत, रहस्यमयी चेंडूवर केले क्लीन बोल्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---