वेस्ट इंडीज आता क्रिकेटच्या नवीन संचालकाच्या शोधामध्ये आहे. कारण जिमी अॅडम्स यांचा कार्यकाळ जूनच्या अखेरीस संपेल. रिचर्ड पायबस नंतर, जिमीने जानेवारी 2017 मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघाच्या संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यावेळी त्यांनी साडेसहा वर्षांसाठीच्या करारावर सही केली होती, जो जून 2023 मध्ये संपणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने क्रिकेटच्या नव्या संचालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. क्रिकेट वेस्ट इंडीजच्या या पदासाठी अर्जदार फक्त 14 जूनपर्यंत अर्ज करू शकतात.
वेस्ट इंडीजचे सध्याचे संचालक जिमी अॅडम्स (Jimmy Adams) यांच्याबद्दल सांगायचे तर, त्यांनी आपल्या कारकिर्दीत 54 कसोटी आणि 127 एकदिवसीय सामने खेळले आहेत. याशिवाय त्यांनी वेस्ट इंडिजचे कर्णधारपदही भूषवले होते. जिमी गेल्या साडेसहा वर्षांपासून वेस्ट इंडीजचे संचालक होते.
जिमी अॅडम्सने महिला क्रिकेटसाठी अनेक महान गोष्टी केल्या
जिमीने (Jimmy Adams) वेस्ट इंडिजच्या (West Indies) महिला क्रिकेटसाठी अनेक खास गोष्टी केल्या आहेत. त्याच्या कार्यकाळात महिला कॅरेबियन प्रीमियर लीगची सुरुवात, महिला आणि युवा संघांसाठी स्वतंत्र निवड पॅनेलची नियुक्ती केली. हे पॅनेल महिला खेळाडूंना समानता मिळवून देण्याच्या दिशेनं काम करेल. (Coach Appointments)
जिमी अॅडम्सने त्याच्या कार्यकाळाच्या शेवटी सांगितले की, “वेस्ट इंडीजच्या होणाऱ्या विकासकमांमध्ये मला सहभागी होता आले ही माझ्या अभिमानाची बाब आहे. या संस्थेत दिग्गज लोकांसोबत काम करण्याचा मला विशेषाधिकार मिळाला आहे. गेल्या 6 वर्षांपासून त्यांनी मला येथे दिलेला पाठिंबा त्याबद्दल मी कायम कृतज्ञ आहे. विशेषत: प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर आपल्यासमोर असलेल्या विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. माझ्या कार्यकाळात वेस्ट इंडिजच्या पुरुष संघाला मैदानावर कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. 2016 मध्ये T20 विश्वचषक जिंकल्यानंतर ते कोणत्याही ICC स्पर्धेच्या (ICC Tournament) बाद फेरीत पोहोचलेले नाहीत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2019-21 आणि 2021-23 या दोन्ही हंगामामध्ये वेस्ट इंडिज संघ तळापासून दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याच वेळी, वेस्ट इंडिजचा पुरुष संघ 2022 च्या टी-20 विश्वचषकातून पहिल्या फेरीत बाहेर पडला. त्यानंतर क्रिकेट वेस्ट इंडीजने वरिष्ठ पुरुष संघासाठी फॉरमॅट-विशिष्ट प्रशिक्षकांची नियुक्ती केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
भारतीय खेळाडूंनी आयपीएलदरम्यान केला डब्ल्यूटीसी फायनलचा सराव! अक्षर पटेलकडून मिळाली मोठी माहिती
विराट-स्मिथकडे डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मोठी संधी, पाँटिंगसह ‘या’ भारतीय दिग्गजाचा विक्रम निघणार मोडीत!