---Advertisement---

बुमराह नसताना भारतीय गोलंदाजांना ‘या’ गोष्टीवर द्यावा लागेल भर; माजी क्रिकेटपटूचा सल्ला

On: शनिवार, जून 28, 2025 10:01 AM
---Advertisement---

इंग्लंडविरुद्ध आगामी दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराह खेळू शकला नाही, तर भारतीय संघाला मोठा फटका बसू शकतो, असा इशारा भारताचा माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेशने दिला आहे. बर्मिंगहॅममध्ये पुढच्या आठवड्यात ही दुसरी कसोटी खेळली जाणार आहे. लीड्स कसोटीत 65 व्या ते 82 व्या षटकादरम्यान बुमराह गोलंदाजीस नव्हता आणि त्याचा फटका भारताला बसलेला दिसून आला. इंग्लंडने हा सामना पाच गडी राखून जिंकत 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

गणेशच्या मते बुमराहच्या अनुपस्थितीत प्रसिद्ध कृष्णाकडे जबाबदारी घेण्याची क्षमता आहे, पण त्यासाठी त्याला आपल्या शैलीत थोडे बदल करावे लागतील. त्याने पीटीआयशी बोलताना सांगितले, “प्रसिद्ध कृष्णा हा नेहमीच विकेट घेणारा गोलंदाज राहिला आहे, पण त्याला सातत्याने योग्य क्षेत्रात गोलंदाजी करण्यावर भर द्यावा लागेल. विशेषतः जेव्हा चेंडू जुना होईल, तेव्हा मेडन ओव्हर्स टाकण्यासाठी याचा फायदा होईल.”

तो पुढे म्हणाला, “इंग्लंडमध्ये हवामानामुळे चेंडू थोडाफार स्विंग होतो. त्यामुळे प्रसिद्धने बुमराहसारखी सतत लाइन-लेंथवर अचूक गोलंदाजी करणे आवश्यक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकल्या जाणाऱ्या चेंडूंवर अधिक लक्ष केंद्रीत करणे त्याला उपयुक्त ठरेल.”

आता जर बुमराह दुसरी कसोटी खेळू शकला नाही, तर भारताला ही कठोर वास्तविकता स्वीकारावी लागेल. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांच्याकडून टप्प्याटप्प्याने कामगिरी झाली होती. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत विशेषतः सिराज आणि प्रसिद्ध यांना अधिक जबाबदारी घ्यावी लागेल आणि अचूक लाइन व लेंथवर लक्ष केंद्रित करावं लागेल, असं गणेश यांनी स्पष्ट केलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---