क्रिकेट या खेळात आतापर्यंत अनेकदा आपण वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पहिले आहे. काही काळापूर्वी वेगवान गोलंदाजांच्या वेगाने अनेक फलंदाज घाबरत असे. अनेक वेगवान गोलंदाजानी इथे वर्चस्व गाजवले आहे. जसे की वसीम अक्रम, शोएब अख्तर, डेल स्टेन, झहीर खान असे अनेक दिग्गज वेगवान गोलंदाज होऊन गेले आणि आजही आहेत. या गोलंदाजांनी अनेकदा आपल्या गतीने फलंदाजांचे त्रिफळे उडवले आहेत. असेच काही दृश्य आपल्याला दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमधील पहिल्या कसोटी सामन्यात बघण्यात आले.
क्रिकेटविश्वात अनेक नवीन प्रतिभाशाली खेळाडू वरती येत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे दक्षिण अफ्रिकाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याचे. वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांची शाबासकी मिळवली आहे.
रबाडाने आपल्या वेगवान गोलंदाजीची प्रदर्शन दाखवत दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजविरुद्ध २० षटक टाकले. त्यातील ९ निर्धाव षटक टाकले आणि ५ विकेट्सही घेतल्या. त्याने त्याच्या गोलंदाजीमध्ये १.७० च्या इकोनॉमिने केवळ ३४ धावा दिल्या. त्याने कर्णधार क्रेग ब्रेथवेटला ७ धावांवर, किरण पोवेला १४ धावांवर, जर्मेन ब्लैकवुडला १३ धावांवर, जोशुआ डिसिल्वाला ९ धावांवर आणि राहकीम कॉर्नवेला ० धावांवर पव्हेलियनला पाठवले.
त्यातही रबाडाच्या वेगवान गोलंदाजीची खरी कमाल ही डावाच्या ६०व्या षटकात पाहायला मिळाली. या षटकात वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक जोशुआ डिसिल्वाने ५१ चेंडूत फक्त ९ धावा केल्या होत्या. अशात रबाडाने ६०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोठा रनअप घेत रबाडाने अतिशय वेगाने चेंडू फेकला. चेंडू इनस्विंग होऊन जोशुआचा ऑफ स्टंप उडाला. हा चेंडू एवढा वेगाने टाकला होती की ऑफ स्टंप काही फूट दूर उडून पडला. हे बघताना जोशुआ आश्चर्यचकित झाला होता. त्याला एक क्षणासाठी कळलेसुद्धा नाही की काय झाले. परंतु शेवटी त्याला पव्हेलियनला परतावे लागले.
Kagiso Rabada picked up five wickets on day 3 as the #Proteas took a 1-0 lead in the test series😎
Day 3 highlights: https://t.co/liWTQgLnkM#WIvSA #ThatsOurGame pic.twitter.com/5UrheiIuo4
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 13, 2021
वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिकामधील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकाने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिज संघाचा पहिल्या डावात ९७ धावांवर संपला होता आणि दक्षिण आफ्रिकाने पहिल्या डावात ३२२ धावा केल्या होत्या. पुढे तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिज संघ दुसऱ्या डावात केवळ १६२ धावांवर गारद झाला आणि अशाप्रकारे दक्षिण अफ्रिका संघाने वेस्ट इंडिजला एक डाव व ६३ धावांनी पराभूत केले.
तिसऱ्या दिवशी रबाडाव्यतिरिक्त एन्रिच नॉर्किएने १४ षटके टाकत ३ विकेट्स घेतल्या होत्या. केशव महाराजला ११ षटके टाकत २ विकेट्स घेण्यात यश आले होते. दक्षिण अफ्रिकी गोलंदाजांनी ६४ व्या षटकातच संघाला सामना जिंकवून दिला.
महत्वाच्या बातम्या
पहिलीवहिली कसोटी चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी ‘या’ ११ खेळाडूंसह भारतीय संघ उतरणार मैदानावर!
मुंबईत जन्मलेला ‘हा’ फिरकीपटू भारतीयांची उडवणार दाणादाण, न्यूझीलंडच्या अंतिम संघात मिळाली जागा
WTC Final: भारताविरुद्धच्या लढतीसाठी न्यूझीलंडचा अंतिम संघ जाहीर, पाहा कोण इन कोण आऊट