---Advertisement---

WMPL 2025: पुणे वाॅरियर्सची अजिंक्य कामगिरी! स्मॅशर्सचा सहज पराभव

On: गुरूवार, जून 12, 2025 2:06 PM
---Advertisement---

वूमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL) 2025 मध्ये आज पार पडलेल्या औपचारिक सामन्यात पुणे वाॅरियर्सने सोलापूर स्मॅशर्सवर 5 विकेट्सनी मात करत आपली विजयी मालिका कायम ठेवली. या विजयासह पुण्याने स्पर्धेत एकही सामना न गमावता अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला आहे, तर सोलापूरदेखील आधीच फायनलसाठी पात्र ठरलेला आहे. सोलापूर संघाने स्पर्धेत केवळ दोन सामने गमावले आहेत, ते दोनही सामने पुणे वाॅरियर्स विरुद्ध पत्करावे लागले आहे.

स्पर्धेतील अंतिम सामना 14 जून शनिवारी पुणे वाॅरियर्स विरुद्ध सोलापूर स्मॅशर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी हा सामना दोन्ही संघासाठी सराव सामना असल्यासारखे होते, कारण सामन्याचा निकालावर कोणताही परिणाम होणार नव्हता.

टाॅस गमावून सोलापूर स्मॅशर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 105 धावा केल्या. या डावात सलामीवीर ईश्वरी सावकारने सर्वाधिक 44 धावा (46 चेंडू) करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. दामिनी बंकरने 17 धावांची खेळी केली. या दोघींशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. कर्णधर तेजल हसबनीस देखील शून्य धावावर बाद झाली. या सामन्यात संघाला तिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र ती आज फ्लाॅप ठरली. या सामन्यात पुण्याने अप्रतिम गोलंदाजी केली. ज्यामुळे सोलापूर स्मॅशर्सचे फलंदाज फ्लाॅप ठरले. पुण्याकडून अनुजा पाटीलने 3 षटकांत 15 धावा देत 3 बळी घेतले, तर चिन्मयी बोरफळेने 4 षटकांत 22 धावांत 3 बळी टिपले.

लक्ष्याचा पाठलाग करताना, पुणे वाॅरियर्सने 18.3 षटकांत 5 विकेट्स गमावून 108 धावा करत सामना आपल्या बाजूने झुकवला. सुहानी कहांडाळने नाबाद 43 धावा (49 चेंडू) करत विजयात मोलाचा वाटा उचलला, तर अनुजा पाटीलने 22 धावांची संयमी खेळी केली. सोलापूरकडून मुक्ता मगरेने 2/18 आणि आरती केदारने 2/17 अशी कामगिरी केली.

हा सामना औपचारिक असला तरी पुणे वाॅरियर्सच्या संघाने अष्टपैलू कामगिरी करत सामन्यावर विजय मिळवला. दोन्ही संघ आता फायनलमध्ये आमनेसामने भिडणार असून, स्पर्धेचा अंतिम सामना उत्कंठावर्धक होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---