fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आफ्रिदीचे आणखी एक मोठं विधान; म्हणतो, हरभजन आणि युवराज…

Wo Majboor Hain Shahid Afridi on Yuvraj Singh Harbhajan Singhs Reaction Against Him Over Controversial Remark

नवी दिल्ली । पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वाईट वक्तव्य केले होते. त्यानंतर आता त्याने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत या विवादाबद्दल आणखी एकदा वक्तव्य केले आहे. आफ्रिदीने म्हटले की, राजकारणात जाण्याचा त्याचा कोणताही हेतू नाही. तो केवळ मानवतेसाठी गरीब लोकांची मदत करत आहे. तसेच त्याने  युवराज सिंग आणि हरभजन सिंगबद्दलही मोठे विधान केले आहे.

झाले असे की, युवराज आणि हरभजनने आफ्रिदीच्या फाऊंडेशनची मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यावर आफ्रिदीने त्या दोघांचेही धन्यवाद दिले होते. परंतु हे दोघे हतबल आहेत आणि ते तिथेच राहतात. ते तिथेच रहात असल्यामुळे त्यांना माहित आहे की, अत्याचार होत आहे. परंतु ते बोलत नाहीत.

यानंतर काही दिवसांनी आफ्रिदीने पाकव्याप्त काश्मीर प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) विवादात्मक विधान केले होते. त्यामुळे युवराज (Yuvraj Singh) आणि हरभजनला (Harbhajan Singh) चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. तरी मोदींवर वाईट विधान केल्यानंतर युवराज आणि हरभजनने आफ्रिदीशी असलेले सर्व नाते तोडले होते.

काश्मीरमध्ये हिंदू लोकांवर अत्याचार झाला असता तर विरोध केला असता-

आफ्रिदीने काश्मीरच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आपले मत स्पष्ट केले आहे. तो म्हणाला की, “काश्मीरमध्ये हिंदू लोक जर रहात असते आणि त्यांंच्यावर अत्याचार झाला असता तर तेव्हाही मी विरोध केला असता. इथे गोष्ट धर्माची नाही तर मानवतेची आहे. पाकिस्तानने नेहमीच भारताला सकारात्मक इशारे दिले आहेत. आम्ही नाते चांगले करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला आहे. नेते नेहमीच संबंध आणि समुदाय जोडण्याविषयी बोलतात. राजकारणात कधीच धर्माला मधे आणले नाही पाहिजे.”

आफ्रिदीने पुढे म्हटले की, “मी पूर्ण भारताबद्दल कधीच बोलत नाही. मला भारतात खूप प्रेम आणि आदर मिळाला आहे. त्यामुळे माझ्या देशातील लोकही माझ्याकडे तक्रार करत असतात की, तू नेहमी भारताचेच नाव घेत असतो.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-जॉन्टी ऱ्होड्स म्हणतो, तो खेळाडू ना तूमच्यासारखा ना माझ्यासारखा तो वेगळाच क्षेत्ररक्षक

-टीकटॉक स्टार झालेल्या चहलला टीकटॉक चाहत्यांनीच केले ट्रोल

-…तर गोलंदाजांना मास्क लावून खेळवावे

You might also like