---Advertisement---

महिला हॉकी विश्वचषक: यजमान संघाने केलेल्या पराभवामुळे टीम इंडिया बाद फेरीतून बाहेर

Spain vs India
---Advertisement---

स्पेन आणि नेदरलॅण्ड्स येथे महिला हॉकी विश्वचषक २०२२ची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारत विरुद्ध स्पेन (INDIAvsSPAIN) यांच्यात क्रॉसओव्हर सामना झाला. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे गरजेचे होते. मात्र  भारताने हा सामना १-० असा गमावला आहे. या पराभवामुळे भारत उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयशी ठरला आहे.

या स्पर्धेत अंतिम आठमध्ये टिकून राहण्यासाठी भारतीय संघासाठी स्पेन विरुद्ध विजय मिळवणे अत्यावश्यक होते. यजमान संघाने हा सामना संपण्यास ४ मिनिटे बाकी असतानाच विजयी गोल करत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या सामन्याआधी भारतीय महिला संघ हॉकी विश्वचषकात न्यूझीलंडकडून पराभूत झाला आहे.

भारताने साखळी फेरीतील न्यूझीलंड विरुद्ध झालेला तिसरा सामना गमावला होता. गुरूवारी(७ जुलै) झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारताला ४-३ असे पराभूत केले होते. ब गटात असलेल्या भारताने इंग्लंड आणि चीन विरूद्ध झालेले दोन्ही सामने अनिर्णीत राखले होते. या दोन्ही सामन्यात निकाल १-१ असा बरोबरीत लागला होता. यामुळे भारताला न्यूझीलंड विरुद्ध जिंकणे आवश्यक होते. मात्र तो सामना गमावल्यामुळे भारताचा प्रवास खडतर झाला.

भारत आणि स्पेन हे दोन्ही संघ नुकत्याच झालेल्या प्रो लीगमध्ये आमने सामने आले होते. दोघांनी यातील प्रत्येकी एक-एक सामना जिंकला होता.

भारतीय संघ आता विश्वचषकामध्ये ९ ते १६व्या स्थानांसाठी बाकी संघांशी दोन हात करणार आहे. मंगळवारी (१२ जुलै) भारताचा सामना कॅनडाशी होणार आहे. कॅनडा संघ क गटातील तिन्ही सामने गमावत शेवटच्या स्थानावर राहिला आहे.

भारतीय संघ विश्वचषकामध्ये नेहमीच अपयशी ठरला आहे. १९७४मध्ये फ्रान्स येथे झालेल्या स्पर्धेत भारत चौथ्या स्थानी राहिला होता. नंतर झालेल्या सहाही विश्वचषकात भारत ६ स्थानांच्या वर पोहोचला नाही. तर सध्या सुरू असलेल्या सातव्या विसश्वचषकात भारत स्पर्धेशेवटी कितव्या स्थानी राहणार हे पाहण्यजोगे ठरणार आहे.

या स्पर्धेचे स्वरूप असे आहे, १६ संघांचे चार गटांमध्ये विभाजन केले आहे. साखळी सामन्यानंतर प्रत्येक गटात अव्वल स्थानावर असलेला संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणार आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाला क्रॉसओवरचे सामने खेळावे लागतील.

या क्रॉसओवरच्या सामन्यात अ गटाच्या दुसऱ्या स्थानावर असलेला संघ गट डच्या तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी भिडेल. तर अ गटाच्या तिसऱ्या स्थानावर असलेला संघ ड गटाच्या दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी सामना होणार आहे.

अशाचप्रकारे ब गटाच्या दुसऱ्या स्थानावर असलेला संघ क गटाच्या तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी भिडेल. तर बी गटाच्या तिसऱ्या स्थानावर असलेला संघ क गटाच्या दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी सामना होणार आहे.

तसेच या चार सामन्यांत जिंकलेले संघ उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पोहोचतील.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

विराटवर टीका करणाऱ्यांवर रोहितची आगपाखड; म्हणाला, ‘हे कोण लोक आहेत, जे…’

सूर्यकुमारचं शतक खरंच स्पेशल! शतकी खेळीसह राहुलला तर पछाडलच, पण विजय हजारेंचीही केली बरोबरी

आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव ठरला केवळ दुसराच फलंदाज, वाचा खास विक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---