---Advertisement---

महिला आयपीएल: मंधना, हरमनप्रीत, मिताली करणार नेतृत्व; असे रंगणार सामने

On: मंगळवार, नोव्हेंबर 3, 2020 8:16 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीगचा १३ वा हंगाम युएईमध्ये सुरु असून आता या हंगामादरम्यान महिला टी२० चॅलेंजच्या म्हणजेच महिला आयपीएलच्या सामन्यांना देखील बुधवारपासून(४ नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतून तब्बल ८ महिन्यांनंतर भारतीय महिला क्रिकेटपटू मैदानावर पुनरागमन करतील. याआधी त्या शेवटच्या टी२० विश्वचषकात खेळताना दिसल्या होत्या.

महिला आयपीएलचा तिसरा हंगाम –

महिला आयपीएल आयोजित करण्याचा हा तिसरा हंगाम आहे. याआधी सन २०१८ ला आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांचा प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला होता. या सामन्याचे यश पाहुन सन २०१९ ला देखील आयपीएलमध्ये महिलांच्या 4 टी20 सामन्यांची मालिका खेळवली गेली. त्यानंतर आता यावर्षी या स्पर्धेचा तिसरा हंगाम होत आहे.

तसेच पहिल्या हंगामात केवळ सुपरनोवाज आणि ट्रेलब्लेझर्स हे दोन संघच होते. तर दुसऱ्या हंगामात वेलोसिटी हा नवीन संघ स्पर्धेत दाखल झाला. यावर्षीही या ३ संघात ४ सामन्यांची मालिका होणार आहे.

आत्तापर्यंत मागील दोन्ही हंगामात हरमनप्रीत कौर कर्णधार असलेल्या सुवरनोवाज संघाने विजेतेपद मिळवले आहे.

कधी आणि कुठे होणार महिल्या आयपीएल २०२० चे सामने –

महिला आयपीएल ही स्पर्धा आयपीएलच्या प्ले ऑफ दरम्यान युएईमध्येच ४ ते ९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. मागीलवर्षीप्रमाणे यंदाही हरमनप्रीत कौर, स्म्रीती मंधना आणि मिताली राज अनुक्रमे सुपरनोवाज, ट्रेलब्लेझर्स आणि वेलोसिटी संघाच्या कर्णधार असतील.

या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या सुपरनोवाज विरुद्ध वेलोसिटी संघात ४ नोव्हेंबरला होईल, तर वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स असा ५ नोव्हेंबरला दुसरा सामना होईल. तिसरा सामना ७ नोव्हेंबरला सुपरनोवाज विरुद्ध ट्रेलब्लेझर्स यांच्यात होईल. यानंतर गुणतालिकेतील पहिल्या २ संघात ९ नोव्हेंबरला अंतिम सामना होईल. हे सर्व सामने शारजाहमध्ये होणार आहेत.

४ आणि ६ नोव्हेंबरला होणारा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाईल. तर ५ नोव्हेंबरला होणारा सामना दुपारी ३.३० वाजता सुरु होईल. तसेच अंतिम सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल.

या भारतीय खेळाडूंवर असेल लक्ष –

या स्पर्धेदरम्यान वेलोसिटी संघाची कर्णधार मिताली राज, शेफाली वर्मा, वेदा कृष्णमूर्ती यांच्यावर तर सुपरनोवाज संघामधील कर्णधार हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स प्रिया पुनिया, राधा यादव या खेळाडूंकडे लक्ष असेल. तसेच ट्रेलब्लेझर्स संघांतील कर्णधार स्म्रीती मंधनासह, दिप्ती शर्मा, पुनम राऊत या खेळाडूंची कामगिरी कशी होते, याकडेही सर्वांचे लक्ष असेल.

या परदेशी खेळाडूंकडे असेल लक्ष – 

या स्पर्धेत भारतीय खेळाडूंसह स्टार परदेशी खेळाडू देखील सहभागी होणार आहेत. ट्रेलब्लेझर्स संघातील इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन, वेस्ट इंडिजची डींड्रा डॉटिन, थायलंडची नाथाकन चानथामवर सर्वांचे लक्ष असेल. तसेच वेलोसिटी संघातील इंग्लंडची डॅनियल वॅट, बांगलादेशची जाहानारा आलम यांच्यावर तर सुपरनोवाज संघातील श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टू, दक्षिण आफ्रिकेची आयाबोंगा खाका यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील.

पुनम राऊतने केला आहे रोहितबरोबर सराव –

मुंबईची असलेली पुनम राऊत १२ वर्षांची असताना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १४ वर्षांखालील उन्हाळी शिबिर चाचणीत सहभागी झाली होती. त्यावेळी ती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघात निवडली देखील गेली होती. ती आणि भारताचा सलामीवीर रोहित शर्मा हा देखील बोरीवलीमधील असल्याने अकादमीत ते दोघे लहान असताना एकत्र सराव करायचे.

महिला आयपीएलचे असे आहेत संघ – 

सुपरनोवाज –

हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमीमह रॉड्रिग्स (उपकर्णधार), चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शशिकला श्रीवर्धने, पूनम यादव, शकेरा सेलमॅन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, आयुषी सोनी, आयाबोंगा खाका, मुस्कान मलिक

ट्रेलब्लेझर्स – 

स्मृती मंधाना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पुनम राऊत, रिचा घोष, डी. हेमलथा, नुझत परविन (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हर्लीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादूर, सलमा खातून, सोफी इक्लेस्टोन, नाथकं चाणथम, डीन्ड्रा डॉटिन, काश्वी गौतम

वेलोसिटी –

मिताली राज (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ती (उपकर्णधार), शेफाली वर्मा, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), एकता बिष्त, मानसी जोशी, शिखा पांडे, देविका वैद्य, सुश्री दिव्यदर्शिनी, मनाली दक्षिणी, ले कास्पेरेक, डॅनियल वॅट, सुने लुस, जहानारा आलम , एम. अनघा.

महिला टी२० चॅलेंजचे वेळापत्रक – 

४ नोव्हेंबर – सुपरनोवाज विरुद्ध वेलोसिटी, शारजाह, वेळ : संध्याकाळी – ७.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

५ नोव्हेंबर – वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स, शारजाह, वेळ : दुपारी – ३.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

७ नोव्हेंबर – ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवा, शारजाह, वेळ : संध्याकाळी – ७.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

९ नोव्हेंबर – अंतिम सामना, शारजाह वेळ : संध्याकाळी – ७.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

महत्त्वाच्या बातम्या –

धोनी आयपीएल २०२१मध्ये करेल ४०० धावा, दिग्गज क्रिकेटपटूने केली भविष्यवाणी

आयपीएल २०२०मध्ये सुपर फ्लॉप ठरलेले ५ खेळाडू, ज्यांना बोली लावताना थरथरतील फ्रंचायझींचे हात

हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला! रहाणेमुळे दिल्ली प्ले-ऑफमध्ये

ट्रेंडिंग लेख-

‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…

IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे

वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---