मुंबई | आज प्रो-कबड्डी 2018च्या लिलावाला सुरुवात झाली. दोन वर्षापुर्वी सुरु झालेली महिलांची प्रो-कबड्डी मात्र एका हंगामानंतर बंद झाली.
ही लीग बंद होण्यापाठीमागचे कारण विचारले असता जयपुर पिंक पॅंथरच् प्रमुख अभिषेक बच्चन म्हणाले, “अाम्ही याबद्दल सकारात्मक आहोत. परंतु याला थोडा वेळ लागेल. महिलांच्या प्रो-कबड्डीला प्रत्यक्ष स्टेडियममध्ये तेवढीच गर्दी होती जेवढी ती पुरुषांच्या सामन्यांना होते. परंतु अाम्हाला स्पाॅन्सर्स तसेच आमचे ब्राॅ़डकास्टर यांचाही विचार करावा लागतो. हे सर्व करुन त्यांना यातुन काय मिळतं याचाही विचार व्हायला हवा. आम्ही येत्या काळात याचा नक्की विचार करु आणि आपल्याला हे सर्व ठिक झालेलं नक्की दिसेल. ”
याबद्दल काहीसं वेगळं मत मशाल स्पोर्ट्सचे चारु शर्मा यांनी व्यक्त केलं. ” आम्हाला स्पर्धात्मक दर्जा हा कमी करायचा नाही. त्यामुळे महिला खेळाडू जेवढ्या प्रमाणावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतील तेवढे चांगले खेळाडू यातुन पुढे येतील. यासाठी जेव्हा मोठ्या प्रमाणात चांगले खेळाडू तयार होतील तेव्हा नक्की आम्ही या लीगचा विचार करु. आम्हाला महिलांची कबड्डी लीग नक्की सुरु करायची आहे. परंतु ते एका दिवसात किंवा हंगामात होणार काम नाही.” असे ते यावेळी म्हणाले.
सध्या या स्पर्धेचा 6व्या हंगामासाठीचा लिलाव मुंबईमध्ये पार पडत आहे. तो गुरुवारी 31 मे रोजी संपन्न होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
– प्रो-कबड्डी लिलावापुर्वी ह्या ५ गोष्टी नक्की माहित करुन घ्या!
–प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली
–या दिग्गज माजी खेळाडूची पुणेरी पलटणच्या प्रशिक्षकपदी निवड
–महाराष्ट्राच्या या तीन खेळाडूंवर लागु शकते प्रो-कबड्डीत सर्वाधिक बोली
–संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावासाठी महाराष्ट्राचे हे ४२ खेळाडू आहेत उपलब्ध
–आयपीएलप्रमाणेच प्रो-कबड्डी लिलावातही वापरता येणार आरटीएम
–कबड्डी- ई भास्करन तमिल थलाइवाजचे मुख्य प्रशिक्षक
–प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी ९ संघानी २१ खेळाडूंना केले कायम