सोमवारी (२३ मे) महिला टी-२० चॅलेंज लीगची सुरुवात पुण्याच्या एमसीएस स्टेडियममध्ये झाली. स्पर्धेचा पहिला सामना सुपरनोव्हाज आणि ट्रेलब्लेझर्स यांच्यात खेळला गेला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील सुपरनोव्हाज संघाने स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्सला धूल चारली. सुपरनोव्हाजने हा सामना ४९ धावांनी जिंकला. त्यांची सालमीवीर फलंदाज डिएंड्रा डॉटिनने संघाला एक चांगली सुरुवात करून दिली, पण खेळपट्टीवरील एका चुकीमुळे ती मोठी खेळी करू शकली नाही.
हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर डिएंड्रा डॉटिन आणि प्रिया पुनियाने मिळून संघाला चांगली सुरुवात करून दिली. डिएंड्राने पहिल्या षटकापासून धमाकेदार फलंदाजीचे प्रदर्शन सुरू केले. ती चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होती, पण थोड्याच वेळात शर्मिन अख्तरच्या अप्रतिम थ्रोमुळे तिला विकेट गमवावी लागली.
डिएंड्राने या सामन्यात सुपरनोव्हाज संघासाठी १७ चेंडूत ३२ धावा केल्या आणि विकेट गमावली. यादरम्यान तिच्या बॅटमधून ५ चौकार आणि एक षटकार निघाला. या धावा तिने १८८ च्या स्ट्राईक रेटने केल्या. पहिल्या विकेटसाठी तिने प्रिया पुनियासोबत ५० धावांची भागीदारी पार पाडली. सुपरनोव्हाज संघाने गमावलेली पहिली विकेट ही डिएंड्राचीच होती.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सुपरनोव्हाजच्या डावातील ५ व्या षटकात डिएंड्राने विकेट गमावली. ट्रेलब्रेलझर्ससाठी हे षटक अरुंधती रेड्डी घेऊन आली होती. षटकातील पहिल्या ५ चेंडूवर तिने ११ धावा खर्च केल्या होत्या. षटकातील शेवटच्या चेंडूवर डिएंड्राने एक धाव घेण्यासाठी प्रयत्न केला. पण तेवढ्यात शर्मिन अख्तरने संधी साधली आणि स्टंपवर वेगात चेंडू घेऊन मारला. तिच्या या जबरदस्त थ्रोमुळे डिएंड्र डॉटिन अपेक्षित खेळी करू शकली नाही.
उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर सुपरनोव्हाजने ४९ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हाजने २० षटकात सर्व विकेट्स गमावल्या आणि १६३ धावा केल्या. प्रत्युत्तारत ट्रेलब्लेझर्सने २० षटकात ९ विकेट्सच्या नुकसानावर ११४ धावा केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
हरमनप्रीतच्या सुपरनोव्हाजने स्म्रीतीच्या ट्रेलब्रेझर्सची केली पळता भुई थोडी, ४९ धावांनी जिंकला सामना
टीम इंडियात निवड न झाल्याने नितीश राणाने व्यक्त केले दु:ख, ट्वीट करत केले मोठे विधान
अगग! एका क्रिकेटरनेच लावला रिषभ पंतला कोटींचा चुना, वाचा संपूर्ण प्रकरण