2024 महिला टी20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी कोणीही न्यूझीलंडला विजेतेपदाचा दावेदार मानत नव्हतं. कारण या संघानं स्पर्धेपूर्वी सलग 10 सामने गमावले होते. याशिवाय न्यूझीलंडचा संघ 2023 टी20 विश्वचषकाच्या बाद फेरीतही पोहोचू शकला नव्हता. ही परिस्थिती पाहता कोणीही न्यूझीलंडकडे चॅम्पियन म्हणून पाहत नव्हतं. परंतु न्यूझीलंडनं अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावलं. या विजयानंतर न्यूझीलंडची क्रिकेटपटू सोफी डिव्हाईन म्हणाली की, टीम इंडियानं त्यांच्यासाठी टोन सेट केला.
वास्तविक, या स्पर्धेत न्यूझीलंडचा पहिला सामना टीम इंडियाविरुद्ध होता. टीम इंडिया विजेतेपदासाठी फेव्हरेट मानली जात होती. संघानं गेल्या काही आयसीसी टूर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी केली होती. याशिवाय न्यूझीलंडच्या आधीच्या फॉर्ममुळेही भारतीय संघ फेव्हरेट मानला जात होता. परंतु ग्रुप स्टेजच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा 58 धावांनी पराभव केला. यानंतर भारतानं दोन सामने जिंकले, मात्र त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. अशाप्रकारे संघ स्पर्धेतून बाहेर पडला.
न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईननं पहिला सामना संघासाठी टर्निंग पॉइंट होता असं सांगितलं. सोफी डिव्हाईन पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाली, “एक क्षण किंवा एक गेम निश्चित करणं खरोखर कठीण आहे. मला वाटतं की, दक्षिण आफ्रिकेतील विश्वचषकानंतर ही आमची सर्वात परिपूर्ण कामगिरी होती. आम्ही सर्व काही एकत्र आले आणि एकमेकांवर विश्वास आणि आत्मविश्वास दाखवला. आपण हे करू शकतो हे जाणून घेतलं.”
ती पुढे म्हणाली, “मला वाटतं की आमच्यासाठी हा एक मोठा क्षण होता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला आमच्या प्रवासात त्याची मदत झाली. प्रत्येकजण सामन्याबद्दल विचार करतो. परंतु जे काम पडद्यामागे घडतं, जे बऱ्याच लोकांना दिसत नाही. मला वाटतं जर तुम्ही कामगिरीबद्दल बोलत असाल, तर भारताचा सामना आमच्यासाठी निश्चितच टोन सेट करणारा होता.”
हेही वाचा –
अर्जुन तेंडुलकरचा गोलंदाजीत जलवा, संघाला मिळवून दिला एकतर्फी विजय!
विश्वास करणे कठीण, सलग 10 सामने हरलेला संघ बनला विश्वविजेता!
टी20 वर्ल्डकप जिंकून न्यूझीलंड मालामाल, आयसीसीनं भारतावरही केला करोडोंचा वर्षाव