सध्या 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पाचवा सामना रविवारी (दि. 15 जानेवारी) पाकिस्तान विरुद्ध रवांडा संघात पार पडला. पुन्हा एकदा विश्वचषकातील या सामन्यादरम्यान मंकडींग पाहायला मिळाली. या घटनेनंतर भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद आणि ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज मार्क वॉ यांच्यामध्ये सोशल मीडियावर खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
झाले असे की, पाकिस्तान महिला (Pakistan Women) संघाची वेगवान गोलंदाज जैब-उन-निसा (Zaib-Un-Nisa) हिने नॉन- स्ट्रायकर एंडवरून बाहेर पडलेल्या रवांडा महिला (Rwanda Women) संघाच्या फलंदाजाला मंकडींगने बाद केले. यानंतर पंचांनीही हात वर करत फलंदाजाला बाद घोषित केले. या घटनेनंतर सोशल मीडियावर दिग्गज क्रिकेटपटू आपापसात भिडताना दिसले.
भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) आणि ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज मार्क वॉ (Mark Waugh) यांना यामध्ये सोशल मीडियावर उडी घेतली. वेंकटेश प्रसाद यांनी सोमवारी (दि. 16 जानेवारी) ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू मार्क वॉ यांच्या संघ विकेट्स घेण्यासाठी ‘मंकडींग’चा वापर ‘जाणूनबुझून’ करत असल्याच्या वक्तव्यावर निशाणा साधला. प्रसाद म्हणाले की, गोलंदाजी बाजूवर चेंडू फेकण्यापूर्वीच पुढे जाणाऱ्या फलंदाजाला कायदेशीररीत्या बाद करणे सर्वात वाईट गोष्ट आहे.
मार्क वॉ यांचे ट्वीट
मार्क वॉ यांनी मंकडींगने धावबाद करण्याच्या व्हिडिओवर भाष्य करत ट्वीट केले होते. त्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले होते की, “सर्वात वाईट गोष्ट. असे वाटते की, संघ विकेट्स घेण्यासाठी जाणूनबुझून नियोजित पद्धतीने याचा वापर करत आहेत.”
The worst thing is it seems that teams are using it as a deliberate planned way to get a wicket.👎
— Mark Waugh (@juniorwaugh349) January 16, 2023
वेंकटेश प्रसाद यांचे सडेतोड प्रत्युत्तर
या ट्वीटला प्रत्युत्तर देत वेंकटेश प्रसाद म्हणाले की, “होय ठीक आहे. गोलंदाजाने कायदेशीररीत्या कोणत्याही खेळाडूला बाद करण्याची योजना बनवणे सर्वात वाईट गोष्ट आहे. क्रीझवर न राहता फलंदाजाने चुकीच्या पद्धतीने फायदा उचलणे, ही सर्वात चांगली गोष्ट आहे.”
Yes right , Bowlers planning to get a player out by legal means is the worst thing
Batsman wanting to take unfair advantage by not staying back in the crease is the best thing 😃 https://t.co/6BLpyLDiAP— Venkatesh Prasad (@venkateshprasad) January 16, 2023
Awesome reply Venkatesh ji!
— Rakshit Shah – DUNKI (@rshah2611) January 16, 2023
वेंकटेश प्रसाद यांनी केलेले ट्वीट सध्या सर्वांचे लक्ष वेधत आहे. काही युजर्स वेंकटेश प्रसाद यांच्या प्रत्युत्तराचे कौतुकही करत आहेत. (women u19 world cup 2023 mankading video this cricketers engage in social media war)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात जिगरा! चेंडू टाकताच पळत सुटला गोलंदाज, फलंदाजाला दाखवला तंबूचा रस्ता; पाहा व्हिडिओ
ही नव्या युगाची नांदी! महिला आयपीएलला करोडो मिळाल्याने पोरी झाल्या खूश; म्हणाल्या…