बल्गेरियातील सोफिया येथे सुरू असलेल्या २० वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी (१९ ऑगस्ट) भारतासाठी ऐतिहासिक दिवस उजाडला. १८ वर्षीय युवा कुस्तीपटू अंतिम पंघलने ५३ किलो फ्रीस्टाइल कुस्ती वजनी गटात सुवर्णपदक आपल्या नावे केले. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारे ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. भारताचा आघाडीचा बॉक्सर अमित पंघल याची ती बहीण आहे.
Antim 🇮🇳 with a historic 🥇 for India
The 17-year-old became the country first-ever U20 world champ in women’s wrestling at #WrestleSofia pic.twitter.com/YML41jkdDt
— United World Wrestling (@wrestling) August 19, 2022
अंतिम पंघल ही प्रथमच जागतिक स्पर्धेत सहभागी झाली होती. अंतिम फेरीपर्यंत तिने अतिशय निर्वीवादपणे मजल मारली होती. अंतिम फेरीत कझाकिस्तानच्या आल्टीन शागायेवा हिचा ८-० असा पराभव केला. आपल्या भावाप्रमाणेच तिने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदके मिळवण्यास सुरुवात केली आहे. अंतिमचा भाऊ अमित पंघल हा भारताचा सध्याचा सर्वोत्तम बॉक्सर मानला जातो. त्याने नुकत्याच झालेल्या बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
अंतिम व्यतिरिक्त या स्पर्धेत भारताच्या इतरही महिला कुस्तीपटूंनी पदके मिळवली. शुक्रवारीच प्रिया मलिक व सोनम मलिक यांनी आपापल्या वजनी गटात रौप्य पदके पटकावली. तर सितो देवी व रितिका यांनी कांस्यपदकांची कमाई केली.