---Advertisement---

आज फायनलमध्ये धडकणार भारत आणि श्रीलंका! कुठे आणि कधी पाहायचा सामना?

On: रविवार, जुलै 28, 2024 10:09 AM
INDW vs SLW
---Advertisement---

महिला आशिया चषकातील (Women’s Asia Cup) आज (28 जुलै) रोजी फायनल सामना खेळळा जाणार आहे. भारत आणि श्रीलंका दोन्ही संघ यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत अपराजित राहिले आहेत. त्यामुळे फायनल सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आह. दांबुला क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. भारतीय वेळेनुसार या फायनल सामन्याला 3 वाजता सुरुवात होणार आहे.

श्रीलंकेनं यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत 3 साखळी सामने खेळले आणि 3 सामन्यात विजय मिळवला. श्रीलंकेनं पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. तर दुसऱ्या सामन्यात मलेशिया संघाचा 144 धावांनी पराभव केला. तिसऱ्या सामन्यात थायलंड संघाला नमवून सेमीफायनलसाठी तिकीट पक्कं केलं होतं. श्रीलंकेनं सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवून फायनलमध्ये धडक मारली.

भारतानंही 3 साखळी सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलमध्ये एँट्री केली होती. पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तान संघाला धूळ चारुन विजयी सलामी दिली होती. दुसऱ्या सामन्यात युएई संघाचा पराभव केला. तर तिसऱ्या सामन्यात नेपाळला 82 धावांनी नमवले होते. सेमीफायनलमध्ये भारतानं बांगलादेशवर 10 गडी राखून विजय मिळवला आणि फायनल सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत.

भारत आणि श्रीलंका दोन्ही संघांना आज एकमेकांचा विजयी रथ रोखण्याचं आव्हान असणार आहे. भारतीय महिला संघानं आतापर्यंत 7 आशिया चषक जिंकले आहे. तर श्रीलंका संघ अद्याप एकही आशिया चषक जिंकू शकला नाही. महिला आशिया चषक (Women’s Asia Cup) स्पर्धेतील हा फायनल सामना ‘हाॅटस्टार’ या चॅनेवर पाहायला मिळणार आहे.  

महत्त्वाच्या बातम्या-

Paris Olympic 2024: 24 कोटी लोक, फक्त 7 खेळाडू…’, लाइव्ह टीव्हीवर पाकिस्तानचा ‘अपमान’
सिराजनं केलेल्या स्लेजिंगनंतर श्रीलंकेच्या ‘या’ फलंदाजानं दिलं जोरदार प्रत्युत्तर
पहिल्या टी20 मधील विजयानंतर कर्णधार सूर्याचा आनंद गगनात मावेना; चक्क! असं काही बोलला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---