भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यामध्ये यंदाच्या महिला आशिया चषकातील (Women’s Asia Cup) फायनल सामना आज (28 जुलै) रोजी खेळला जाणार आहे. हा सामना दांबुला क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघांनी यंदाच्या महिला आशिया चषक स्पर्धेत अद्याप एकही सामना गमावला नाही. त्यामुळे फायनल सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटतटीची लढत पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी भारतानं टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
फायनल सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग 11
भारतीय महिला संघ- स्म्रीती मानधना, शफाली वर्मा, उमा चेत्री, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कनवर, रेणुका ठाकूर सिंग
श्रीलंका महिला संघ- विश्मी गुणरत्ने, चमारी अट्टापटू(कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिल्हारी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी(यष्टीरक्षक), हसिनी परेरा, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी, सचिन निसानसाला
भारतीय महिला संघाची धुरा हरमनप्रीत कौरकडे (Harmanpreet Kaur) आहे. तर श्रीलंका संघ चमारी अट्टापटूच्या (Chamari Athapaththu) नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. भारत 8व्यांदा महिला आशिया चषकाची ट्राॅफी उंचावण्यासाठी सज्ज असेल तर श्रीलंका पहिल्या जेतेपदासाठी भारतीय संघाचा सामना करताना दिसणार आहे.
भारतानं साखळी सामन्यात पाकिस्तान, युएई आणि नेपाळ या संघांना पराभूत करुन सेमीफायनलसाठी स्थान पक्कं केलं होतं. सेमीफायनल सामन्यात भारतानं बांगलादेशचा धुव्वा उडवून फायनलचं तिकीट मिळवलं होतं. तर श्रीलंकेनं साखळी सामन्यात बांगलादेश, मलेशिया आणि थायलंड संघांना पराभूत केलं आणि सेमाफायनलमध्ये धडक मारली. सेमीफायनल सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानचा पराभव करुन फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता दोन्ही संघ महिला आशिया चषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अवघ्या 29 मिनिटांत काम तमाम! पीव्ही सिंधूच्या ऑलिम्पिक मोहिमेला धडाक्यात सुरुवात
अफगाणिस्तान भारतात खेळणार कसोटी सामना, तारीख आणि मैदान ठरलं
सूर्याच्या नेतृत्वाबद्दल ‘या’ खेळाडूनं केलं मोठं वक्तव्य! म्हणाला, “जर कर्णधार तुम्हाला…”