महिला आशिया चषक 2022च्या स्पर्धेतील दुसरा सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना शनिवारी (1 ऑक्टोबर) सिलहेट आउटर क्रिकेट स्टेडियम, सिलहेट येथे खेळला जाणार आहे. या स्पर्धेचे यजमान बांगलादेश आहे. त्यांनी 2018मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले होते. तर भारत आतापर्यंत सर्वाधिक असे सहावेळा आशिया चषकाचा चॅम्पियन ठरला आहे.
ही स्पर्धा टी20 प्रकारामध्ये खेळली जाणार आहे. या सामन्यासाठी झालेल्या नाणेफेकीमध्ये श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टू हीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने नुकतेच इंग्लंडमध्ये वनडे मालिका जिंकली असून कामगिरीत सातत्य राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे, तर श्रीलंका संघाची सध्याची कामगिरी चांगली ठरत आहे.
भारताने आशिया चषकाचे वनडेमध्ये चार वेळा आणि टी20मध्ये दोन वेळा विजेतेपद जिंकले आहेत. या स्पर्धेत भारत पुन्हा एकदा हरमप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करण्यास तयार आहे. तसेच भारतीय संघ मागील 23 वर्षात पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धांमध्ये मिताली राज-झुलन गोस्वामी यांच्याशिवाय खेळणार आहेत.
भारत विरुद्ध श्रीलंका हा सामना ज्या मैदानावर खेळला जाणार आहे, ती खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकुल आहे. त्यामुळे भारताच्या संघात तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांना अंतिम अकरामध्ये निवडले आहे.
Womens Asia Cup. India XI: S Mandhana, S Verma, J Rodrigues, H Kaur (c), R Ghosh (wk), S Rana, D Sharma, P Vastrakar, R Yadav, D Hemalatha, R Singh. https://t.co/3iXm09MbIW #INDvSL #AsiaCup2022
— BCCI Women (@BCCIWomen) October 1, 2022
भारताची प्लेईंग इलेवन-
शफाली वर्मा, स्म्रीती मंधाना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दायलन हेमलता, दीप्ति शर्मा, जेमीमाह रोड्रीगेज, रिचा घोष (विकेटकीपर), पूजा वस्त्राकार, स्नेह राणा, राधा यादव, रेणुका सिंग.
श्रीलंकेची प्लेईंग इलेवन-
हसिनि परेरा, चमारी अट्टापट्टू (कर्णधार), हर्षिता मदवी, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर) निलाक्षी डीसिल्व्हा, कविशा दिलहारी, मलशा शेहानि, ओशाडी रणसिंगे, सुगंदिका कुमारी, आयनोका रणवीरा, अचीनी कुलासुरिया.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BIG NEWS: जसप्रीत बुमराह संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार नाही! जाणून घ्या भारताचे ‘ट्रॅव्हल प्लॅनिंग’
मीराबाईचा सुवर्ण धडाका सुरूच! राष्ट्रीय स्पर्धेतही केली विक्रमी कामगिरी
T20 World Cup 2022: टीम इंडियामध्ये दोन बदल! वेगवान गोलंदाजांची संघामध्ये एंट्री






