आज (८ मार्च) जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. स्वकर्तृत्वावर मोठ्या पदापर्यंत जाऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या महिलांचा या दिवशी गुणगौरव केला जातो. क्रीडा क्षेत्रामध्ये ही अशा मेहनती महिला खेळाडूंमुळे त्या खेळाला एक विशिष्ट ओळख मिळाली आहे. आज आपण भारतीय क्रीडा क्षेत्रातील अशाच काही महिला खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या कामगिरीने त्या खेळाला भारतात ओळख मिळवून दिली.
१) मिताली राज –
भारतात क्रिकेट हा अगदी पहिल्यापासून प्रसिद्ध खेळ आहे. मात्र, भारतात महिला क्रिकेटला नवी ओळख मिळवून देण्याचे काम मिताली राजने केले. मुलींना क्रिकेटबाबत प्रेरणादायक वाटेल अशी कामगिरी मितालीने केली आहे. २० वर्षापेक्षा अधिक काळापासून ती भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करते. आजतील जगभरातील अनेक महिला खेळाडूंसाठी प्रेरणा आहे.
२) बचेंद्री पाल –
पुरुषांची मक्तेदारी मानल्या गेलेल्या गिर्यारोहण क्षेत्रात भारताचा झेंडा फडकवणारी पहिली महिला गिर्यारोहक म्हणून बचेंद्री पाल यांचे नाव घेतले जाते. त्यांनी गिर्यारोहणाच्या अनेक स्पर्धांमध्ये त्या भारताचे नेतृत्व केले आहे. त्या जगातील सर्वात उंच शिखर मानल्या जाणाऱ्या माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला गिर्यारोहक आहेत.
३) मेरी कॉम –
भारतात तितक्याशा प्रसिद्ध नसलेल्या बॉक्सिंग या खेळात एमसीए मेरी कॉमने स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे. तब्बल सहावेळा विश्वविजेतेपद मेरी कॉमने पटकावले असून, २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये देखील तिने कांस्यपदक आपल्या नावे केले होते. त्याच वर्षी तिला भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले.
४) सानिया मिर्झा –
अनेक दिग्गज पुरुष टेनिसपटू असलेल्या भारताकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकित महिला टेनिसपटू म्हणून सानिया मिर्झा हिच्याकडे पाहिले जाते. सानिया इतपत कोणत्याही भारतीय महिला टेनिसपटूने आजवर प्रसिद्धी मिळवली नाही. तिच्या नावे सहा ग्रँडस्लॅम विजेतेपदे आहेत. तसेच, विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने भारतासाठी ६ सुवर्णासह १४ पदके पटकावली आहेत.
५) दिपा कर्माकर –
भारतीयांना तितकासा ज्ञात नसलेला जिम्नॅस्टिक हा खेळ प्रसिद्ध करण्यात दीपा कर्माकर हिचा मोठा हात आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावणारी ती एकमेव भारतीय महिला जिम्नॅस्ट आहे. तिने, २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत, चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती.
६) सायना नेहवाल –
पुलेला गोपीचंद व प्रकाश पदुकोण हीच भारतीय बॅडमिंटनची ओळख असलेली नावे होती. मात्र, सायना नेहवालने बॅडमिंटनला भारतामध्ये वलय मिळवून दिले. जगातील सर्व प्रमुख स्पर्धा तिने जिंकल्या आहेत. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावत तिने बॅडमिंटनमध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते.
महत्वाच्या बातम्या:
अगग, लग्नाआधीच जावई प्रेम जगजाहीर! शाहिद-शाहीनचा तो व्हिडिओ भन्नाट व्हायरल, लोक घेतायत मजा
इंग्लंडला पराभवानंतर अजून एक धक्का, हा प्रमुख गोलंदाज टी२० मालिकेला मुकण्याची शक्यता