भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने बिहार राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कणकरबाग, पटना येथे महिलांची ६६ व्या सीनियर राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसारच दिनांक ११ ते १४ जुलै २०१९ या काळात ही स्पर्धा होणार आहे.
राष्ट्रीय स्पर्धा होणे ही फक्त कबड्डी खेळासाठी महत्वाची गोष्ट नसून ती महिला कबड्डी खेळाडूंच्यादृष्टीने अत्यंत महत्वाची स्पर्धा आहे. ही स्पर्धा काही दिवसांपुर्वी घोषीत झाली होती परंतु होणार की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच सोशल माध्यमांवरही स्पर्धेच्या भवितव्याबद्दल नकारात्मक सुर लावला जात होता.
परंतु आता बिहार राज्य कबड्डी असोसिएशननी सर्व संबंधित राज्य कबड्डी असोसिएशला पत्रक लिहून कळवले आहे की, जरी देशात पावसाचे वातावरण असले तरीही बिहारमधील हवामान आता सर्वसाधारण आहे. त्यामुळ नियोजित कार्यक्रमानुसार ६६ व्या राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद-महिला स्पर्धा होणार आहे. तरी आपल्या राज्याच्या महिला संघाने स्पर्धेत सहभागी व्हावे.
स्पर्धेची तयारी जवळपास अंतिम टप्पात अजून, काही काम पूर्णही झाली आहेत. काल २३ जुलैला बिहार कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्ष अंजनी कुमार सिंग यांची स्पर्धा आयोजनात सहभागी असलेल्या सर्व समिती सदस्यांशी मिटींगदेखील झाली आहे.