‘महिला प्रीमियर लीग’च्या (Women Premier League) आगामी हंगामापूर्वी आज रविवार (15 डिसेंबर) रोजी मिनी लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. लीगचा मिनी लिलाव आता संपला आहे. रविवारी झालेल्या या लिलावात एकूण 19 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. लिलावानंतर सर्व संघातील 18 खेळाडूंचे स्क्वाॅड पूर्ण झाले आहे. यावेळी महिला प्रीमियर लीगच्या मिनी लिलावात भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. भारताची स्टार खेळाडू सिमरन शेख (Simran Shaikh) ही लिलावात सर्वात महागडी ठरली.
‘महिला प्रीमियर लीग’च्या (Women Premier League) लिलावात सर्वाधिक पैसा स्टार खेळाडू सिमरन शेखवर (Simran Shaikh) खर्च झाला. गुजरात जायंट्सने (Gujarat Giants) तिला 1.90 कोटी रूपयांमध्ये आपल्या संघात सामील केले. लिलावात तिच्यापेक्ष्या महाग कोणीही विकले गेले नाही. सिमरनचा संघात समावेश करण्यासाठी दिल्ली, गुजरातमध्ये स्पर्धा होती, पण शेवटी गुजरातने बाजी मारत, तिला 1.90 कोटी रूपयांमध्ये संघात सामील केले.
विदेशी खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजची स्टार खेळाडू ‘डिआंड्रा डॉटिन’ला (Deandra Dottin) सर्वाधिक रक्कम मिळाली आहे. डिआंड्रा डॉटिनला देखील गुजरातने खरेदी केलं आहे. गुजरातने डाॅटिनला 1.70 कोटी रूपयांमध्ये आपल्या संघात सामील केले.
लिलावात विकले गेलेले 19 खेळाडू-
डिआंड्रा डॉटिन- गुजरात जायंट्स- 1.70 कोटी रूपये
नादिन डी क्लर्क- मुंबई इंडियन्स- 30 लाख रूपये
जी कमलिनी- मुंबई इंडियन्स- 1.60 कोटी रूपये
सिमरन शेख- गुजरात जायंट्स- 1.90 कोटी रूपये
नंदिनी कश्यप- दिल्ली कॅपिटल्स- 10 लाख रूपये
प्रेमा रावत- राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- 1.20 कोटी रूपये
एन चारनानी- दिल्ली कॅपिटल्स- 55 लाख रूपये
आरुषी गोयल- यूपी वॉरियर्स- 10 लाख रूपये
क्रांती गौर- यूपी वॉरियर्स- 10 लाख रूपये
संस्कृती गुप्ता- मुंबई इंडियन्स- 10 लाख रूपये
जोशिता व्हीजे- राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- 10 लाख रूपये
सारा ब्राइस- दिल्ली कॅपिटल्स- 10 लाख रूपये
अलाना किंग- यूपी वॉरियर्स- 30 लाख रूपये
राघवी बिस्त- राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- 10 लाख रूपये
जागर्वी पवार- राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- 10 लाख रूपये
निक्की प्रसाद- दिल्ली कॅपिटल्स 10 लाख रूपये
अक्षिता माहेश्वरी- मुंबई इंडियन्स- 20 लाख रूपये
डॅनियल गिब्सन- गुजरात जायंट्स- 30 लाख रूपये
महत्त्वाच्या बातम्या-
गाबाच्या मैदानावर कोहली-भज्जीचा भन्नाट डान्स, व्हायरल व्हिडिओ एकदा पाहाच
धारावीच्या झोपडपट्टीतील मुलगी करोडपती बनली! WPL लिलावात मिळाली बेस प्राईज पेक्षा 19 पट रक्कम
महिला प्रीमियर लीगमध्ये पैशांचा वर्षाव, लिलावात 16 वर्षीय मुलगी बनली करोडपती!