राष्ट्रकुल क्रिडा महासंघाने 2022 ला बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला टी20 क्रिकेटचा समावेश केला आहे. याची घोषणा आज आयसीसीने केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटच्या समावेशासाठी आयसीसी आणि इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डने प्रयत्न केले होते.
याबद्दल आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू सावनी म्हणाले, ‘महिला क्रिकेटसाठी आणि संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. महिला क्रिकेटचे सामर्थ्य वाढत आहे आणि आम्हाला आभिमान आणि आनंद आहे की राष्ट्रकुल क्रिडा महासंघाने बर्मिंगहॅम 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला टी20 क्रिकेट समाविष्ट करण्यासाठी मतदान केले.’
तसेच इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनीही राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्याच्या निर्णयाने आनंद झाल्याचे म्हटले आहे. तसेच हा निर्णय महिला क्रिकेटच्या उज्वल भविष्याचा संकेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
1998 नंतर पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेट खेळले जाणार आहे. 1998 ला क्वाला लंपूरमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 50 षटकांच्या क्रिकेट प्रकारात दक्षिण आफ्रिका संघाने सुवर्णपदकाची कमाई केली होती.
1998 नंतर पुन्हा एकदा राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचे कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे अध्यक्ष डेम लुईस मार्टिन डीबीई यांनी स्वागत केले आहे. तसेच त्यांनी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे.
2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा 27 जूलै ते 7 ऑगस्ट 2022 दरम्यान इंग्लंडमध्ये होणार आहे. या स्पर्धेत महिला क्रिकेटचे 8 संघ 8 दिवस एकमेकांशी स्पर्धा करतील. हे सर्व सामने एजबस्टन क्रिकेट ग्राऊंडवर होतील.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–…तर टीम इंडियाचे कसोटीतील अव्वल स्थान येणार धोक्यात
–या सहा दिग्गजांपैकी एक होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक!
–या देशाच्या सर्वाधिक खेळाडूंनी खेळले आहेत ३००पेक्षा अधिक वनडे