आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेतील तिसरा सामना शनिवारी (दि. 11 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडला. पार्ल येथे खेळण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 97 धावांनी शानदार एकतर्फी विजय साकारली. या सामन्यात एलिसा हिली ही जरी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरली असली, तरीही स्टार अष्टपैलू एलिस पेरी हिने शानदार कामगिरी करत इतिहास रचला.
एलिस पेरीचा विक्रम
महिला टी20 विश्वचषक 2023 (Womens T20 World Cup 2023) स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध एलिस पेरी (Ellyse Perry) हिने अष्टपैलू कामगिरी केली. तिने यादरम्यान पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 22 चेंडूत एकूण 40 धावांचे योगदान दिले. यादरम्यान तिचा स्ट्राईक रेट हा 181.82 इतका होता. याव्यतिरिक्त ती गोलंदाजीतही चमकली. तिने एक षटक गोलंदाजी करताना 4 धावा खर्च करत 1 विकेटही नावावर केली. यासोबत तिने खास कामगिरी केली.
एलिस पेरी ही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 1500 धावांसोबतच 100हून अधिक विकेट्स मिळवणारी ऑस्ट्रेलिया संघाची पहिली महिला खेळाडू बनली.
🚨Milestone Alert🚨
Ellyse Perry becomes 1st Australian to score 1500+ runs and take 100+ wickets. #CricketTwitter #T20WorldCup pic.twitter.com/vexXXR5h99
— Female Cricket (@imfemalecricket) February 11, 2023
खरं तर, महिला क्रिकेटमध्ये पाकिस्तानची निदा दर आणि सोफी न्यूझीलंडची सोफी डिवाईन हिनेदेखील हा कारनामा केला आहे.
एलिस पेरी हिने महिला टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 37 सामने खेळले आहेत. तिच्याव्यतिरिक्त मेग लॅनिंग (35) आणि सूझी बेट्स (33) यांनीही 30हून अधिक सामने खेळले आहेत. अशात आता एलिस पेरीकडे टी20 विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळण्याच्या रोहित शर्माच्या 39 सामन्यांचा विक्रम मोडण्याचीही संधी आहे.
Australia start their campaign in style 💪
📝: https://t.co/MMwIVqgXy5 #AUSvNZ | #T20WorldCup | #TurnItUp pic.twitter.com/xLbC4s5XXZ
— ICC (@ICC) February 11, 2023
ऑस्ट्रेलियाचा दमदार विजय
बोलँड पार्क, पार्लच्या मैदानात नाणेफेकीत पराभूत होऊन ऑस्ट्रेलिया महिला संघ प्रथम फलंदाजीला आला. यावेळी ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 173 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा डाव 14 षटकातच 76 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 97 धावांनी खिशात घातला. यावेळी न्यूझीलंड संघाचे दोन्ही सलामी फलंदाज एकही धाव न करता शून्यावर बाद झाले. दुसरीकडे, अमेलिया केर हिने सर्वाधिक 21 धावांचे योगदान दिले. इतर कुणालाही 15 धावांचा आकडाही पार करता आला नाही. (womens t20 world cup 2023 cricketer ellyse perry makes history for australia women team know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इकडं रोहितने शतक ठोकलं अन् तिकडं पत्नीने डायरेक्ट केली ‘ही’ मागणी; म्हणाली, ‘प्लीज माझ्यासाठी…’
हार्दिक पुन्हा चढणार बोहल्यावर! व्हॅलेंटाईन डेला उदयपूरमध्ये रंगणार शाही विवाहसोहळा