महिला टी20 विश्वचषक 2024 च्या 20 व्या सामन्यात इंग्लंडचा सामना वेस्ट इंडिजशी झाला. वेस्ट इंडिजचा संघ हा सामना 6 विकेटने जिंकण्यात यशस्वी ठरला. या विजयासह संघाने उपांत्य फेरी गाठली. तर इंग्लंडचा प्रवास संपला. अशा प्रकारे या स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. अ गटातून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. त्याचबरोबर ब गटातून दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता चाहत्यांना उपांत्य फेरीच्या सामन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सेमीफायनलचे दोन्ही सामने कधी आणि कुठे खेळले जातील ते पाहुयात.
ऑस्ट्रेलियन संघ ग्रुप अ मध्ये अव्वल आहे. कारण त्यांनी ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकले आहेत. त्यांचा सामना ब गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघाशी होईल. म्हणजेच या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. हा सामना गुरुवार, 17 ऑक्टोबर रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ वेस्ट इंडिजशी भिडणार आहे. हा सामना 18 ऑक्टोबरला म्हणजेच शुक्रवारी शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
पहिला उपांत्य फेरी: 17 ऑक्टोबर; ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
दुसरी उपांत्य फेरी: 18 ऑक्टोबर; न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज (शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजा)
महिला टी20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वोत्तम विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत सहा वेळा ट्रॉफी जिंकली आहे. यावेळीही ऑस्ट्रेलिया टी20 विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. ग्रुप स्टेजमध्येच ऑस्ट्रेलियन संघाचे वर्चस्व दिसून आले. ज्यामध्ये संघाने आपले चारही सामने जिंकले आणि उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. त्यांची कामगिरी पाहता यावेळी सातव्यांदा ट्रॉफीवर कब्जा करण्यात कांगारू संघ नक्कीच यशस्वी होईल. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
हेही वाचा-
IPL 2025; मेगा लिलावापूर्वीच CSKच्या खेळाडूनं केलं रोहितचं कौतुक! म्हणाला, “रोहित भाई…”
PAK vs ENG; शानदार शतक झळकावल्यानंतर कामरान गुलामने बाबरला हिणवले? म्हणाला…
‘या’ भारतीय खेळाडूची ऑस्ट्रेलियाला जास्त भीती! ऑस्ट्रेलिया कर्णधाराचे वक्तव्य