न्यूझीलंडमध्ये सध्या महिला विश्वचषक २०२२ स्पर्धा (Women’s World Cup 2022) खेळवली जात आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने दमदार सुरुवात केली होती. मिताली राजच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने या विश्वचषकातील आपल्या अभियानाला सुरुवात केली होती. या सामन्यात भारताने पाकिस्तानला १०७ धावांनी मात दिली होती. आता भारताचा या स्पर्धेतील दुसरा सामना यजमान न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळत आपली विजयी लय कायम राखण्याचा भारतीय संघाचा (team India) प्रयत्न असणार आहे. तरी भारतीय संघाला या सामन्यासाठी आपल्या प्रमुख फलंदाज लयीत येण्याची आशा असेल. कारण स्म्रीती मंधना व्यतिरिक्त भारताच्या अन्य प्रमुख फलंदाज पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरल्या होत्या. पण, तळात स्नेह राणा आणि पुजा वस्त्राकर यांनी केलेल्या संघर्षामुळे भारताने २०० धावांचा टप्पा पार केला होता.
तसेच भारताची गोलंदाजीतील कामगिरी शानदार झाली होती. त्यामुळे गोलंदाजांना हीच लय न्यूझीलंडविरुद्धही राखावी लागणार आहे.
न्यूझीलंडबाबत बोलायचे झाले, तर त्यांचा भारताविरुद्धचा हा तिसरा सामना असणार आहे. यापूर्वी त्यांना वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला होता. पण दुसऱ्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध त्यांनी विजय मिळवला. त्यामुळे आपले स्थान भक्कम करण्यासाठी न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्धही विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. तसेच त्यांना मायदेशातील परिस्थितीचाही फायदा मिळू शकतो.
विश्वचषकातील न्यूझीलंड महिला विरुद्ध भारतीय महिला (India vs New Zealand) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. महिला विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना केव्हा होणार?
– महिला विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना १० मार्च २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. महिला विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना कुठे खेळवला जाणार?
– महिला विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना सेडन पार्क, हेमिल्टन येथे खेळवला जाईल.
३. महिला विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना किती वाजता सुरु होणार?
– महिला विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६.३० वाजता सुरु होईल. त्याआधी सकाळी ६.०० वाजता नाणेफेक होईल.
४. महिला विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– महिला विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. महिला विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– महिला विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
भारतीय महिला – स्म्रीती मंधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, ऋचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, झुलन गोस्वामी, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, तानिया भाटिया, रेणुका सिंग, यस्तिका भाटिया.
न्यूझीलंड महिला – सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, अमेलिया केर, एमी सदरथवेट, मॅडी ग्रीन, फ्रान्सिस मॅके, केटी मार्टिन (यष्टीरक्षक), हेली जेन्सन, ली ताहुहू, जेस केर, हन्ना रो, रोझमेरी मायर, ब्रूक हॅलिडे, फ्रॅन जोनास, जॉर्जिया प्लिमर.
महत्त्वाच्या बातम्या –
घरच्या मैदानावर आयपीएल जिंकण्याची मुंबईला सुवर्णसंधी! ठोकू शकतात विजेतेपदाचा षटकार
नव्या कसोटी क्रमवारीत जडेजा नंबर वन! पंत-विराटही फायद्यात