ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (३ एप्रिल) पार पडला. या सामन्यात इंग्लंडची वेगवान गोलंदाज कॅट क्राॅस देखील खेळत होती. हा सामना इंग्लंडला ७१ धावांनी पराभूत व्हावा लागला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पण असे असले तरी या सामन्याचे महत्त्व केट क्राॅससाठी खूप जास्त आहे. कारण ५ वर्षांपूर्वी ती विश्वचषकाचा अंतिम सामना खेळू शकली नव्हती.
जेव्हा २०१७ साली इंग्लंडमध्ये महिला विश्वचषक खेळवण्यात आला होता, तेव्हा इंग्लंडने भारताला अंतिम सामन्यात पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले होते. पण याच विश्वचषकात केट क्रॉसचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला नव्हता.
संघात स्थान न मिळाल्याने केटला महिला विश्वचषकाचा अंतिम सामना पाहायला जायचे नव्हते, परंतु कुटुंबियांनी मनवल्यानंतर ती सामना पाहायला जाण्यासाठी तयार झाली. अंतिम सामन्याची सुरुवातसुद्धा तिला पाहता आली नाही, यामागच्या कारणाचा तिने खुलासा केला होता.
ती तीची मैत्रिण एलेक्स हार्टलीच्या बाॅयफ्रेंडसोबत अंतिम सामना पाहायला जाणार होती. परंतु, ती मोटर सर्विस स्टेशनवरील टाॅयलेटमध्ये अडकली, त्यामुळे ती सामन्यापूर्वी मैदानात पोहचू शकली नाही. याच कारणास्तव ती विश्वचषक २०१७ मधील अंतिम सामन्याची सुरुवात पाहू शकली नाही.
मात्र यावेळी तिने विश्वचषकासाठी इंग्लंड संघात स्थान मिळवले, त्याचबरोबर अंतिम सामन्यात देखील ती खेळली. परंतु तिला काही खास कामगिरी करता आली नाही.
कॅट क्राॅसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात ८ षटकांत ६५ धावा देत एकही विकेट घेतली नाही. या सामन्यात एक वेळ अशी सुद्धा आली की एकाच षटकात तिला तीन वेळा अपयश आले. ऑस्ट्रेलियाच्या डावाचे २१ वे षटक क्राॅसने टाकले. या षटकापूर्वी ऑस्ट्रेलियाने ९२ धावा केल्या होत्या. रेचल हेन्स आणि एलिसा हिली ही जोडी क्रिजवर होती. क्राॅसच्या पहिल्या चेंडूवर हेन्सने जोरदार शाॅट लगावला, त्यावर चेंडू पाठीमागे उभ्या असलेल्या डानी व्हाटकडे गेला. परंतु, तिने झेल घेतला नाही. यावेळी हेन्सला जीवनदान मिळाले.
क्राॅसच्या याच षटकात चौथ्या चेंडूवर अजून एक एक झेल सुटला. यावेळी एलिसा हिलीला जीवनदान मिळाले. क्रॉसचा एक चेंडू हिलीने मिडविकेटच्या दिशेने खेळला. तिथे क्षेत्ररत्रण करत असलेली नेट सायवरने झेल घेण्यासाठी उडी घेतली. परंतु, ती झेल घेऊ शकली नाही. त्यामुळे तीनही वेळा क्राॅसच्या पदरी निराशाच आली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या ३५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे खेळाडू ४३. ४ षटकात २८५ धावांवरच सर्वबाद झाला. त्यामुळे हा सामना ऑस्ट्रेलियाने ७१ धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेविरुद्ध धवनची बॅट आग ओकणार! ‘रनमशीन’ला मागे टाकत ‘बड्या’ विक्रमात सर्वांवर सरस ठरणार
अक्षर पटेलने परदेशी खेळाडूला शिकवला ‘बल्ब उतारो डान्स’, Video पाहून व्हाल लोटपोट