न्यूझीलंडमध्ये खेळला जात असलेला आयसीसी महिला विश्वचषक आता अंतिम टप्प्यात आला आहे. परंतु, भारतीय संघ रविवारी (२७ मार्च) या स्पर्धेतून बाहेर पडला. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात भारतीय महिला संघा दक्षिण अफ्रिकेकडून पराभव पत्करला आणि स्पर्धेतून बाहेर पडला. मिताली राजच्या नेतृत्वातील भारतीय संघाने विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केले, पण शेवटी दक्षिण अफ्रिकेने बाजी मारली. शेवटच्या षटकात पडलेल्या एका नो बॉलमुळे सामना भारताच्या हातातून निसटला. पराभवानंतर कर्णधार मिताली राजने महत्वाची प्रतिक्रिया दिली.
दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या षटकात ७ धावांची गरज होती. षटकातील पहिल्या ४ चेंडूंवर दक्षिण अफ्रिकेने ४ धावा केल्या आणि एक विकेट देखील गमावली. त्यानंतर अफ्रिकी संघाला शेवटच्या २ चेंडूत ३ धाव करण्याची आवश्यकता होती, तेव्हा मिग्नोन डू प्रिझ (Mignon du Preez) हिने लॉन्ग ऑनच्या दिशेने मोठा फटका खेळला आणि झेल देऊन बसली. भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले.
पण तितक्यात कळले की, गोलंदाज दिप्ती शर्मा (Deepti Sharma) हिच्याकडून एक चूक झाली आहे. दिप्तीने टाकलेला हा चेंडू नो बॉल होता. या एका चेंडूमुळे सामन्याची दिशा पूर्णपणे बदलली. ही विकेट मिळाली असती, तर भारतीय संघ विजयी ठरू शकत होता.
पराभवानंतर भारतीय कर्णधार मिताली राज (Mithali Raj) वर्चुअल पत्रकार परिषदेत दिप्ती शर्माची एकप्रकारे पाठराखण केली. ती म्हणाली की, “कुठे ना कुठे, नो बॉल भारतीय संघासाठी काम करत असल्याचे दिसत नाहीय. मला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना आठवत आहे. त्या सामन्यातही शेवटच्या षटकात असेच काही घडले होते. पण मला वाटते की, दिप्ती एका फलंदाज आणि गोलंदाजाच्या रूपात तिचे शेवटचे काही एकदिवसीय सामने खेळली नाहीय. तरीही तिने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ती असाधारण आहे. झूलन गोस्वामीच्या उपस्थितीत संघ मजबूत बनतो, पण या सामन्यात तिच्या जागी दिप्ती खेळेली आणि तिला माहिती होते, शेवटच्या षटकांमध्ये कशी गोलंदाजी करायची आहे.”
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर भारताने प्रथम फलंदाजी करत ७ विकेट्सच्या नुकसानावर २७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिकी संघाने ७ विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. भारताच्या पराभवानंतर वेस्ट इंडीज आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women’s World Cup 2022) स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पोहोचणारा चौथा संघ बनला.
महत्वाच्या बातम्या –
पंजाब संघ ‘या’ बाबतीत खरंच आहे ‘किंग्स’, भल्याभल्या संघांना जे जमलं नाही; ते यांनी करून दाखवलंय
अर्रर्र! मागील १० हंगामांपासून मुंबई इंडियन्स ‘या’ गोष्टीत ठरतोय फ्लॉप; वाचून तुम्हालाही बसेल शॉक






