---Advertisement---

बोंबला! पावसाने पुन्हा केला घात, भारत-इंग्लंड सराव सामना रद्द

Rain in IND vs ENG wram up match
---Advertisement---

आगामी वनडे विश्वचषकाचे सराव सामने शुक्रवारी (29 सप्टेंबर) सुरू झाले. विश्वचषकात जयमानपदाची भूमिका पार पाडणाऱ्या भारतीय संघाला शनिवारी (30 सप्टेंबर) आपला पहिला सामना खेळायचा होता. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करायची होती. मात्र, पावसामुळे हा सामना एकही चेंडू न खेळवता रद्द केला गेला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना गुवाहाटीच्या बरसापुरा क्रिकेट स्टेडियमवर आयोजित केला गेला होता. भारतीय संघाने या सामन्यात नाणफेक गमावल्यामुळे त्यांना प्रथम गोलंदाजी करावी लागणार होती. पण नाणेफेक झाल्यानंतर सामना सुरू होण्याआधी मैदानात पावसाने हजेरी लावली. पाऊस मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे पंचांना सामना रद्द करावा लागला. दरम्यान, शुक्रवारी देखील दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सराव सामना पावसामुळे रद्द केला गेला होता. हा सामना त्रिवेंद्रममध्ये आयोजित केला गेला होता.

सराव सामन्यासाठी उभय संघ
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी

इंग्लंड-
डेविड मलान, जॉनी बेअरस्टो, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, सॅम करन, डेव्हिड विली, आदिल रशीद, गस ऍटकिन्सन, रीस टोपले, मार्क वूड.

महत्वाच्या बातम्या – 
World Cup Countdown: वर्ल्डकप ट्रॉफी उंचावण्याची हॅट्रिक करणारी ऑस्ट्रेलिया
सराव सामन्यात भारत आणि इंग्लंड आमने-सामने, टॉस जिंकून रोहितने घेतली बॅटिंग; पाहा संघ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---