सोमवारी (२२ ऑगस्ट) जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीत विजय नोंदवला तर बी साई प्रणीत सोमवारी तीन गेमच्या लढतीत पराभूत झाला. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये, २०१९ कांस्यपदक विजेत्या प्रणीतने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चायनीज तैपेईच्या चो तिएन चेनला कडवी झुंज दिली पण शेवटी १५-२१, २१-१५, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला.
दरम्यान, माजी राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांनी महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत मालदीवच्या अमिनाथ नबिहा अब्दुल रज्जाक आणि फातिमाथ नबाहा अब्दुल रज्जाक यांचा २१-७, २१-९ असा पराभव केला. अश्विनी आणि सिक्की यांना दुसऱ्या फेरीत चेन किंग चेन आणि जिया यी फॅन या अव्वल मानांकित चीनच्या जोडीचे कडवे आव्हान असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्याला माझी गरज…’ अनेक वर्ष एकत्र खेळलेल्या डिव्हिलियर्सने विराटला दिला प्रेमाचा सल्ला
‘वंडर बॉय’ गिलच्या ‘वंडरफुल शतकाने रोहितचा १२ वर्ष जुना विक्रम ध्वस्त