---Advertisement---

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी जोडीनं भारताला मिळवून दिलं कांस्यपदक

Chirag-Shetty-And-Satwik-Sairaj-rockey-Reddy
---Advertisement---

भारतीय स्टार बॅडमिंटन जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकीरेड्डी यांना उपांत्य फेरीत मलेशियाच्या आरोन चिया आणि सोह वूई यिक यांच्याकडून 22-20, 18-21, 16-2 असा पराभव पत्करावा लागला. पराभवानंतरही भारतीय त्यांनी कांस्यपदक जिंकण्यात यश मिळविले आहे. जपानची राजधानी टोकियो येथे खेळल्या जात असलेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारतीय जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकिरेड्डी यांनी जपानच्या युगा कोबायाशी आणि ताकुरो होकी जोडीचा 24-22, 15-21, 21-14 असा पराभव केला. उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्यात यश आले. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकीरेड्डी या जोडीने चॅम्पियनशिपच्या पुरुष दुहेरी प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून देण्यात यश मिळवले आहे.

जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीला पहिल्या गेममध्ये विजयाचा फायदा घेता आला नाही आणि 77 मिनिटे चाललेल्या या सामन्यात 22-20, 18-21, 16-21 असा पराभव पत्करावा लागला. सात्विक आणि चिराग या मलेशियाच्या जोडीचा हा सलग सहावा पराभव आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कॉमनवेल्थ गेम्सच्या मिश्र सांघिक फायनलमध्येही त्यांना या जोडीकडून पराभव पत्करावा लागला होता.

या पराभवानंतरही भारतीय जोडीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत भारताचे पदक निश्चित केले. 2011 नंतर भारताने या स्पर्धेत नेहमीच पदके जिंकली आहेत. 2011 मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने महिला दुहेरीत कांस्यपदक जिंकल्यानंतर जागतिक चॅम्पियनशिपमधील दुहेरीतील भारताचे हे दुसरे पदक आहे.

दरम्यान, जागतिक चॅम्पियनशिपमधील भारताचे हे एकूण 13 वे पदक आहे. पीव्ही सिंधूने 2019 मधील सुवर्ण पदकासह या स्पर्धेत एकूण पाच पदके जिंकली आहेत तर सायना नेहवालने एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले आहे. याशिवाय किदाम्बी श्रीकांतने रौप्य, लक्ष्य सेन, बी साई प्रणीत आणि प्रकाश पदुकोणने कांस्यपदक पटकावले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकातील महामुकाबल्यापूर्वी ‘किंग कोहली’ने दिला आठवणींना उजाळा! सांगितले पाकिस्तानविरुद्धचे किस्से
सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानने फोडली डरकाळी, भारतासह सर्व संघ सावध
आशिया चषकात भारत दुसऱ्यांदा करणार विजेतेपदाची हॅट्रिक! ८ वर्षात नाही पाहिले पराभवाचे तोंड

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---