3 जुलैपासून ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स’ 2024 ची सुरुवात झाली. युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्ताननंही कर्णधार युनूस खानच्या नेतृत्वाखाली आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकले आहेत. आता 6 जुलैला हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. दोन्ही संघांचा हा सामना बर्मिंगहॅममध्ये खेळला जाणार आहे. आता एका रिपोर्टनुसार, भारत-पाक सामन्याची सर्व तिकिटं विकली गेली असून स्टेडियम पूर्णपणे हाऊसफुल्ल झालं आहे. एजबॅस्टन स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची सर्व 23,000 तिकिटं विकली गेली आहेत.
या सामन्यात युवराज सिंग आणि शाहिद आफ्रिदी हे दोन दिग्गज देखील खेळणार आहेत, जे नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषक 2024 चे ॲम्बेसेडर होते. या दोघांशिवाय, भारताकडून सुरेश रैना, इरफान पठाण, हरभजन सिंग आणि अंबाती रायडू खेळणार असून पाकिस्तान संघाकडून कर्णधार युनूस खान, शोएब मलिक, मिसबाह उल हक, शाहिद आफ्रिदी आणि मोहम्मद हफीजसारखे दिग्गज खेळाडू खेळणार आहेत.
3 जुलै रोजी भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यानं ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स’ची सुरुवात झाली. त्या सामन्यात रॉबिन उथप्पानं भारतासाठी 50 धावा तर गुरकीरत सिंग माननं 17 चेंडूत 33 धावा केल्या होत्या. भारतानं हा सामना 3 गडी राखून जिंकला. भारताचा दुसरा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध होता. या सामन्यात गुरकीरत सिंगची बॅट पुन्हा तळपली. यावेळी त्यानं 42 चेंडूत 7 गगनचुंबी षटकारांसह 86 धावांची तुफानी खेळी केली.
भारताचा संघ – रॉबिन उथप्पा, नमन ओझा, सुरेश रैना, युवराज सिंग (कर्णधार), गुरकीरत सिंग मान, इरफान पठाण, युसूफ पठाण, विनय कुमार, हरभजन सिंग, धवल कुलकर्णी, राहुल शुक्ला, आरपी सिंग, सौरभ तिवारी, अनुरीत सिंग, राहुल शर्मा, अंबाती रायडू, पवन नेगी.
पाकिस्तानचा संघ – कामरान अकमल, शोएब मकसूद, शोएब मलिक, युनूस खान (कर्णधार), मिसबाह उल हक, शाहिद आफ्रिदी, अब्दुल रझाक, आमिर यामीन, वहाब रियाझ, सईद अजमल, तौफिक उमर, मोहम्मद हाफीज, यासिर अराफत, सोहेल तन्वीर, सोहेल खान, उमर अकमल, तनवीर अहमद
महत्त्वाच्या बातम्या –
झिम्बाब्वेचे मुख्य प्रशिक्षक आहेत शुबमन गिलचे फॅन, भारतीय कर्णधारावर केला कौतुकाचा वर्षाव
चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार का? समोर आलं मोठं अपडेट
थालाची हवा; वाढदिवासाआधी चाहत्यांमध्ये भलतीच क्रेझ! इथे लावला चक्क 100 फुटी कट आऊट