---Advertisement---

फिफा विश्वचषक: क्रोएशियाच्या अध्यक्षांनी केला खेळांडूसोबत ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष

---Advertisement---

रशिया।  फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाने यजमान रशियावर पेनाल्टी शूट-आऊट मध्ये 4-3 असा विजय मिळवला. यावेळी खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये केलेल्या जल्लोषात त्यांच्या पहिला महिला अध्यक्ष कोलिंडा ग्रबर किटारोविच यांनीही सहभाग घेतला.

किटारोविच यांनी हा सामना फिफाचे अध्यक्ष जियान्नी इन्फैंटिनो आणि रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांच्यासोबत व्हीआयपी बॉक्समध्ये बसून बघितला.

यावेळी किटारोविच यांनी क्रोएशियाच्या झेंड्याचे रंग असलेले कपडे घातले होते. तर सामना सुरू असताना खेळाडूंनी गोल तसेच चांगला खेळ केल्यावर टाळ्या वाजवून, ओरडून आपला आंनद व्यक्त करत होत्या.

रशियाच्या डेनिस चेरीशेवने या सामन्याचा पहिला गोल 31व्या मिनीटाला केला. यावेळी किटारोविच यांनी मेदवेदेव यांचे अभिनंदन पण केले होते. मात्र 8 मिनीटांनंतर खेळ पूर्णपणे बदलला.

लुका मोद्रिक हा सामनावीर ठरला. त्याने आपल्या संघासोबत यावेळी ड्रेसिंग रूममध्ये सेलेब्रेशन केले. तेव्हा किटारोविच यांनीही यात सहभाग घेतला.

मोद्रिकने या स्पर्धेतील 5 सामन्यात 2 गोल केले आहेत.

फिफा विश्वचषकाच्या पेनाल्टी शूट-आऊटमध्ये जिंकणारा हा तिसावा सामना

2-2 असा बरोबरीत असलेला सामना क्रोएशियाने पेनाल्टीमध्ये 4-3 असा जिंकला. तसेच क्रोएशियाने या स्पर्धेत दोनदा पेनाल्टी शूट-आऊट करून सामने जिंकले आहे.

असे करणारा क्रोएशिया अर्जेंटीनानंतरचा दुसरा संघ आहे. 1990मध्ये पहिल्यांदा असा पराक्रम अर्जेंटीनाने केला होता.

फिफा विश्वचषकातील हा तिसावा सामना ठरला ज्याचा निकाल पेनाल्टीमुळे लागला. 1982मध्ये जर्मनी विरूद्ध फ्रान्स उपांत्य सामन्यात पहिल्यांदा पेनाल्टीवर निकाल लावला गेला.

महत्त्वाच्या बातम्या-

-एकवेळ चालवत होता पाणीपुरीचा गाडा आता थेट भेटला मास्टर ब्लास्टर सचिन…

-रोहीतच्या नावावर असाही एक पराक्रम ज्याचा विचार काही खेळाडू फक्त करु…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment