दक्षिण आफ्रिका संघाचा अनुभवी फलंदाज क्विंटन डी कॉक याचा विश्वचषक 2023मधील धमाकेदार खेळ सुरूच आहे. विश्वचषक स्पर्धेतील हा 10वा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये खेळला जात आहे. जगभरातील दिग्गज फलंदाज ज्या ऑस्ट्रेलियान गोलंदाजांपुढे गुडघे टेकतात, त्यांना डी कॉकने अवघ्या 90 चेंडूत शतक ठोकले. विश्वचषकातील हे त्याचे सलग दुसरे शतक आहे.
यावर्षीच्या विश्वचषकातील पहिला सामना दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. क्विंटन डी कॉक याने या सामन्यात 84 चेंडूत 100 धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. दक्षिण आफ्रिका संघाने या सामन्यात 5 बाद 428 धावा कुटल्या होत्या, जी विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या ठरली. श्रीलंकन संघ 102 धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत झाला. क्विंटन डी कॉक आपला शेवटचा विश्वचषक खेळत असून ही स्पर्धा संपल्यानंतर तो वनडे क्रिकेटमधून निवृत्ती देखील घेणार आहे. अशात वनडे क्रिकेटमधील आपले शेवटचे काही सामने आठवणी राहण्यासाठी डी कॉक वादळी फॉर्म दाखवताना दिसत आहे. (World Cup 2023 । BACK TO BACK HUNDREDS BY QUINTON DE KOCK)
विश्वचषकातील दहाव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी
महत्वाच्या बातम्या –
भारत जिंकला, पण स्टार गोलंदाजाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम; स्वप्नातही आठवावा नाही वाटणार
मोठी बातमी! ‘या’ दौऱ्यासाठी पाकिस्तान संघ जाहीर, वर्षभरानंतर अनुभवी खेळाडूचे पुनरागमन