वनडे विश्वचषकाची सुरुवात जो रुट याच्यासाठी अप्रतिम राहिली. गुरुवारी (5 ऑक्टोबर) विश्वचषक 2023चा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. गतविजेत्या इंग्लंड संघाला पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकता आली नाही आणि त्यांचा संघ प्रथम फलंदाजीसाठी आला. एकट्या जो रुट याने या सामन्यात इंग्लंडसाठी अर्धशतक ठोकले. रुटचा एक षटकार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
जो रुट (Joe Root) याने न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात इंग्लंडसाठी गुरुवारी (5 ऑक्टोबर) 86 चेंडूत 77 धावांची सर्वोत्तम खेळी केली. अर्धशतक करण्यासाठी रुटने 57 चेंडू घेतले. आपल्या डावात रुटने 4 चौकार आणि एकच षटकार त्याने मारला. पण रुटचा हा एक षटकार सर्वांचे लक्ष वेधत आहे. अनुभवी ट्रेंट बोल्ट गोलंदाजी करत असताना रुटने डावातील 12 व्या षटकात रिव्हर्स स्वीप मारला. षटकातील तिसऱ्या चेंडूवर रुटने हा अप्रतिम शॉट मारला आणि चेंडू हवाईमार्गे थेट सीमारेषेपार जाऊन पडला. आयसीसीच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे.
https://www.instagram.com/reel/CyAyMZ6vm0g/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर 282 धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी 283 धावांची गरज आहे. जो रुटव्यतिरिक्त या सामन्यात जोस बटलर याने 43 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तसेच सलामीवीर जॉनी बेअरस्टो याने 33 धावांचे योगदान दिले. संघातील इतर एकही फलंदाज 25 धावांपेक्षा मोठी खेळी करू शकला नाही. न्यूझीलंडसाठी मॅट हेन्री याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सॅटनर यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्ट आणि रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (World Cup 2023 । ENG vs NZ Joe Root reverse ramp)
इंग्लंड प्लेईंग इलेव्हन- जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, जो रूट, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वूड, हॅरी ब्रूक.
न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन- डेवॉन कॉनवे, विल यंग, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, टॉम लॅथम( कर्णधार), ग्लेन फिलिप्स, ट्रेंट बोल्ट, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, रचिन रवींद्र, मॅट हेन्री
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपचं पहिलं अर्धशतक रुटच्या नावावर, एकट्याने फोडून काढली न्यूझीलंडची गोलंदाजी
‘काय राव हे…?’, पत्रकाराच्या प्रश्नावर रोहितने दिली ‘अशी’ रिऍक्शन, पाकिस्तानी कर्णधार बाबरही झाला लोटपोट