भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाने रविवारी (8 ऑक्टोबर) एममेकांविरुद्धच्या सामन्यात विश्वचषक 2023 अभियानाची सुरुवात केली. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर आपल्या संघाला चांगली सुरुवात देऊ शकला. पण अर्धशतक करण्याआधीच कुलदीप यादव याने त्याची विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील 17 व्या षटकात कुलदीप यादव (Jasprit Bumrah) गोलंदाजीला आला होता. षटकातील तिसऱ्या चेंडूवर डेविड वॉर्नर (David Warner) याने कुलदीपच्याच हातात झेल दिला. एकूण 52 चेंडूंचा सामना केल्यानंतर वॉर्नरने संघासाठी 41 धावांचे योगदान दिले आणि तंबूत परतला.
Caught and bowled! ????
Kuldeep Yadav breaks the partnership ????
David Warner departs for 41.
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/rMXDAzkqko
— BCCI (@BCCI) October 8, 2023
त्याआधी भारताला पहिली विकेट जसप्रीत बुमराहने मिळवून दिली. सलामीवीर मिचेल मार्श 6 चेंडू खेळून एकही धाव न करता बुमराहची शिकार बनला. डावातील अवघ्या तिसऱ्याच षटकात दुसऱ्या चेंडूवर मिचेल मार्शने विराट कोहली याच्या हातात विकेट गमावली. (World Cup 2023 । IND vs AUS । Kuldeep Yadav gets David Warner )
विश्वचषकातील पाचव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा, जोश हेझलवूड.
महत्वाच्या बातम्या –
आजपर्यंत जो विक्रम सचिन-डिविलियर्सच्या नावावर होता, तो वॉर्नरने टाकला मोडून; बनला यादीतील टॉपर
IND vs AUSच्या वर्ल्डकप अभियानाला सुरुवात! टॉस जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, पाहा तगडी प्लेइंग XI