शुक्रवारी (3 नोव्हेंबर) विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्स आणि अफगाणिस्तान संघ आमने सामने आले. गुणतालिकेत आठ आणि सहा या क्रमांकावर असणाऱ्या या संघांमधील लढत बरोबरीची होईल, असे सामन्याच्या आधीपासून वाटत होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय करणाऱ्या नेदर्लंड्सला या सामन्यात कशीबशी 179 धावांपर्यंत मजल मारता आली.
नेदरलँड्स आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा सामना लखनऊच्या इकाना स्टेडियमवर आयोजित केला गेला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या नेदरलँड्स संघाला या सामन्यात मोठी धावसंख्या करता आली नाही. सीब्रँड एंजेलब्रेच (Sybrand Engelbrecht) याने सर्वाधिक 58 धावांची खेळी या सामन्यात केली. तसेच सलामीवीर मॅक्स ओ डाऊड यानेही महत्वपूर्ण 42 धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तान संघासाठी या सामन्यात मोहम्मद नबी (Mohammad Nabi) याने 9.3 षटकांमध्ये सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. नूर अहमद आणि मुजीब उर रहमान यांनी अनुक्रमे 2 आणि एक विकेटचे योगदान संघासाठी दिले.
(Afghanistan needs 180 runs to defeat the Netherlands.)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
नेदरलँड्स – वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओ डाऊड, कॉलिन एकरमन, सीब्रँड एंजेलब्रेच, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), बास डी लीडे, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन
अफगाणिस्तान – रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इकराम अलीखिल, अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, फझलहक फारूखी, नूर अहमद.
महत्वाच्या बातम्या –
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडक देणारे ‘हे’ आहेत चार संघ, जाणून उपांत्य सामन्यांचे वेळापत्रक
आकाश चोप्राने रोहितचे नाव घेत केले मोठे वक्तव्य, म्हणाला, ‘कोणाचीही कारकीर्द उद्ध्वस्त…’