ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने शनिवारी (दि. 11 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपला अखेरचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळला. या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला 8 विकेट्सने पराभूत करत साखळी फेरीचा शानदार शेवट केला. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाला स्पर्धेच्या सुरुवातीला भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, त्यानंतर संघाने पुढे चांगली लय पकडत मागे वळूनच पाहिले नाही. त्यांनी सलग 7वा विजय नावावर करत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. आता सातव्या विजयानंतर कर्णधार पॅट कमिन्स याने मोठी प्रतिक्रिया दिली.
बांगलादेश संघाविरुद्ध विजय मिळाल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) म्हणाला की, “हा उपांत्य फेरीत जाण्यापूर्वी एक शानदार विजय होता. आम्ही पहिल्या डावात शानदार प्रदर्शन केले नव्हते, पण आम्ही त्यांना त्या धावसंख्येवर रोखले, ज्याचा पाठलाग केला जाऊ शकत होता.”
संघाच्या सर्व खेळाडूंनी केलेले प्रदर्शन आणि त्यामुळे वाढलेल्या डोकेदुखीविषयी कमिन्स म्हणाला, “ही एक चांगली समस्या आहे. सर्व 15 खेळाडूंनी या स्पर्धेतील सामने खेळले आहेत. आम्ही त्यांची निवड करू शकतो. मार्शची खेळी लाजवाब होती आणि ज्याप्रकारे त्याने शेवट केला, तेदेखील जबरदस्त होते. 300पेक्षा जास्त धावांचा पाठलाग आम्ही पहिल्यांदाच केला नव्हता, पण आता असे वाटत आहे, सर्व ठीक होत आहे.”
ऑस्ट्रेलियाने विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठ्या आव्हानाचा पाठलाग बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात केला आहे. ऑस्ट्रेलियाने मागील सामन्यात हा विक्रम कायम केला होता, पण आता त्यांनी या सामन्यात सर्वाधिक आव्हानाचा पाठलाग करण्याचा विक्रम मागे टाकला आहे.
ऑस्ट्रेलियाला पुढील उपांत्य फेरीतील सामना खेळायचा आहे. त्यांना 16 नोव्हेंबर रोजी कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचा आहे. साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला मोठ्या फरकाने हरवले होते. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया संघ या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवत अंतिम सामन्यात जागा मिळवण्याचा प्रयत्न करेल. (world cup 2023 australia captain pat cummins victory bangladesh says this read here)
हेही वाचा-
टाईम आऊट वादावर राहुल द्रविडचा शाकिबला भक्कम पाठिंबा; म्हणाला, ‘तो…’
Happy Diwali: अफगाणी खेळाडूची मन जिंकणारी कृती! मध्यरात्री फुटपाथवर झोपलेल्यांना वाटले पैसे, कौतुकच कराल