---Advertisement---

जरा इकडे पाहा! भारताच्या माजी प्रशिक्षकाने वर्ल्डकपसाठी निवडला अंतिम संघ, ‘या’ 2 शिलेदारांना दिला डच्चू

Team-India
---Advertisement---

येत्या 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघाला बहुप्रतिक्षित आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठीच्या संघाचीही निवड करायची आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत मिळून 17 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. या संघातूनच वनडे विश्वचषकाचा संघ निश्चित केला जाणार आहे. अशात भारतीय संघाच्या माजी फलंदाजी प्रशिक्षकानेही आपल्या संघाची निवड केली आहे.

आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेनंतर भारतीय संघाला आपल्याच देशात आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) स्पर्धा खेळायची आहे. भारताने 2011साली एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वाखाली वनडे विश्वचषक जिंकला होता. अशात सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडूनही चाहते विश्वचषक विजयाची अपेक्षा करत आहेत. आशिया चषकासाठी निवडलेल्या 17 सदस्यीय संघामधूनच विश्वचषकासाठी 15 सदस्य निवडले जाणार असल्याचे बोलले जात आहे. अशात भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी तिलक वर्मा (Tilak Varma) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांना आपल्या विश्वचषक संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

बांगर यांनी निवडलेला संघ
कर्णधार रोहितच्या नेतृत्वात विश्वचषक खेळणाऱ्या संघात बांगर यांनी विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर यांना फलंदाज म्हणून निवडले आहे. तसेच, गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, आणि अक्षर पटेल यांच्या नावाचा समावेश आहे. ईशान किशन आणि केएल राहुल यांना यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवडले आहे.

संजय बांगर यांचा 15 सदस्यीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर आणि सूर्यकुमार यादव. (world cup 2023 cricketer sanju samson and tilak verma out of sanjay bangar world cup final team know here)

हेही वाचा-
‘आज माझी आई…’, अफगाणिस्तानविरुद्ध मॅचविनर ठरलेला नसीम शाह भावूक- व्हिडिओ
बीसीसीआयचा खिसा भरणार गच्च! टीम इंडियाला मिळाला नवीन टायटल स्पॉन्सर, 3 वर्षांमध्ये छापणार ‘एवढा’ पैसा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---