भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयवर पैशांचा पाऊस पडणार आहे. मायदेशातील आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी बीसीसीआयला नवीन टायटल स्पॉन्सर मिळाला आहे. बीसीसीआयची टायटल स्पॉन्सरची डील आपल्या नावावर करण्यात आयडीएफसी फर्स्ट बँक यशस्वी ठरली. आयडीएफसीव्यतिरिक्त सोनी स्पोर्ट्सही बीसीसीआय टायटल स्पॉन्सरच्या शर्यतीत होती. मात्र, आयडीएफसी फर्स्ट बँकेने बाजी मारली. आता बीसीसीआयसोबत 3 वर्षांसाठी हा करार असणार आहे. या अंतर्गत बँकेला बीसीसीआयला प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी 4.2 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
खरं तर, फक्त 2 कंपन्या लिलावाच्या प्रक्रियेत सामील असल्यामुळे बीसीसीआयने मूळ रक्कम कमी करून 2.4 कोटी रुपये केली होती. पेटीएमकडून अधिकार घेतल्यानंतर मास्टरकार्ड प्रत्येक सामन्यासाठी बोर्डाला 3.8 कोटी रुपये देत होते. मात्र, आता यामध्ये 40 लाख रुपयांची वाढ झाली आहे.
IDFC bags title rights for Team India's home International series. (To Cricbuzz)
The rights were acquired for 4.2 Crores per International match. pic.twitter.com/3KeowL2q4T
— CricketMAN2 (@ImTanujSingh) August 25, 2023
मुंबईमध्ये बीसीसीआय टायटल स्पॉन्सरचा लिलाव पार पडला. सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank) टायटल स्पॉन्सर असल्याचे जाहीर केले गेले. अशात पुढील महिन्यात 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Austalia) मालिकेसाठी आयडीएफसी फर्स्ट बँक टायटल स्पॉन्सर असेल.
बीसीसआय आणि आयडीएफसी फर्स्ट बँकमधील करार 1 सप्टेंबरपासून 3 वर्षांसाठी असेल. करारात भारतातील 56 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, पुढील 3 वर्षांमध्ये या करारातून बीसीसीआयच्या खिशात जवळपास 987 कोटी रुपये येणार आहेत. रंजक बाब अशी की, सोनी स्पोर्ट्सने बीसीसीआय टायटल स्पॉन्सरशिपसाठी बोली लावली होती. सोनी अजूनही बीसीसीआयच्या मीडिया अधिकारांच्या शर्यतीत कायम आहे.
बीसीसीआय टायटल स्पॉन्सर लिलावाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. या सर्वाला मार्केटची खराब स्थिती आणि वाढलेली किंमत कारणीभूत असल्याचे सांगितले गेले. खरं तर, मोठमोठ्या कंपन्या या भारतातील द्विपक्षीय मालिकांच्या तुलनेत आयपीएल सामन्यांसाठी जास्त रस दाखवतात. मात्र, बोली लावणाऱ्या कंपन्याना आकर्षित करण्यासाठी बीसीसीआयने मूळ रक्कम कमी करून 2.4 कोटी ठेवली होती.
या नव्या करारामध्ये एकूण 56 सामन्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने असणार आहेत. (big news idfc first bank becomes title sponsor of team india for international home series)
हेही वाचा-
नेपाळ संघाला हलक्यात घेऊच नका, बलाढ्य संघांना दिलाय धोबीपछाड, टीम इंडियाला राहावे लागेल सावधान!
पोरगा टीम इंडियाचा, नव्या दमाचा! गिलपुढे विराटची फिटनेसही पडली फिकी, Yo-Yo Testमध्ये मिळवले ‘एवढे’ गुण