आशिया चषक 2023 स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेऊन भारतीय संघ सध्या बंगळुरू येथे आहे. बंगळुरूच्या अलूरमध्ये कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारतीय संघ सराव करत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव स्टेडिअमच्या बाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. 24 ऑगस्ट) खेळाडूंची फिटनेस आणि मेडिकल चाचणी झाल्यानंतर शुक्रवारी संघाने पहिल्या सराव सत्रात भाग घेतला. पहिल्या दिवशी जवळपास 6 तास खेळाडूंनी घाम गाळला. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनी जवळपास 1 तास नेट्समध्ये फलंदाजी केली. अशात काही खेळाडूंचा यो-यो टेस्ट स्कोरही समोर आला आहे.
आयपीएल 2023दरम्यान दुखापतग्रस्त झालेला भारतीय संघाचा स्टार खेळाडू केएल राहुल हादेखील यावेळी फलंदाजीचा सराव करताना दिसला. साई किशोर आणि कुलदीप यादव यांनी विराटला बराच वेळ गोलंदाजीही केली. हाती आलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ जवळपास 10 ते 12 गोलंदाजांसोबत सराव करत आहे.
यो-यो टेस्टमध्ये शुबमन गिल आघाडीवर
खेळाडूंनी यो-यो टेस्टमध्ये किती गुण मिळवले, हे जाणून घेण्यापूर्वी आपण या टेस्टमध्ये पास होण्यासाठी किती गुण आवश्यक असतात, ते पाहूयात. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, यो-यो टेस्ट पास होण्यासाठी 16.5 गुण मिळवावे लागतात. यापूर्वी पास होण्यासाठी फक्त 16.1 गुणांची अट होती.
सराव सत्रात सामील होण्यापूर्वी खेळाडूंची यो-यो टेस्ट झाली. यात सर्व खेळाडू पास झाले. शुबमन गिल यो-यो टेस्टमध्ये (Shubman Gill Yo-Yo Test) चांगले गुण मिळवत पास झाला. त्याने सर्वाधिक 18.7 गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे, विराट कोहली यानेही यो-यो टेस्टमध्ये (Virat Kohli Yo-Yo Test) चांगले गुण मिळवले, पण गुणांच्या बाबतीत तो गिलच्या मागे पडला आहे. विराटने 17.2 गुण मिळवले आहेत.
Shubman Gill scored the highest in the Yo-Yo test – 18.7. (PTI). pic.twitter.com/ikQIQpUPFy
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 25, 2023
विराटला चेतावणी
गुरुवारी विराटने इंस्टाग्राम स्टोरी ठेवून आपला यो-यो टेस्ट सार्वजनिक केला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, विराटने आपली खासगी माहिती सार्वजनिक केल्याने बीसीसीआय त्याच्यावर नाराज आहे. विराटने असे केल्यानंतर बीसीसीआयने इतर खेळाडूंना तंबी दिली आहे की, त्यांनी अशी खासगी माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये. हे करारातील कलमांचे उल्लंघन मानले जाईल. (india’s young cricketer shubman gill scored highest score on the yo yo test defeated virat kohli in terms of fitness ahead of asia cup 2023)
हेही वाचा-
World Cup 2023साठी गांगुलीने निवडला भारताचा ‘दादा’ संघ, ‘या’ मॅचविनर धुरंधरांची हाकालपट्टी; टाका नजर
ऐतिहासिक दिवस! भारतीय महिला अंध क्रिकेट संघाची कौतुकास्पद कामगिरी, ऑस्ट्रेलियाच्या नांग्या ठेचत गाठली फायनल