अवघ्या 4 दिवसात आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघात खेळला जाणार आहे. हा सामना 30 ऑगस्ट रोजी मुल्तानच्या क्रिकेट मैदानात पार पडणार आहे. जवळपास सर्व क्रिकेट बोर्डांनी स्पर्धेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. नेपाळ संघ भारत आणि पाकिस्तानसोबत अ गटात आहे. तसेच, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघ ब गटात आहेत. नेपाळ संघाला अनेक संघ हलक्यात घेत असतील, पण नेपाळ हा हलक्या संघांपैकी नसून मजबूत संघ आहे. त्यांनी मागील काही काळात भल्याभल्या संघांना पराभवाचं पाणी पाजलं आहे.
नेपाळ (Nepal) संघाने यावर्षी क्वालिफायर सामन्यांमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. अंतिम सामन्यात त्यांनी यूएईसारख्या संघाला 7 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला होता. नेपाळ यावर्षी पहिल्यांदाच आशिया चषक खेळत आहे. यापूर्वी नेपाळ संघ या स्पर्धेसाठी कधीही क्वालिफाय करू शकला नव्हता. नेपाळ संघाने मागील काही काळात जबरदस्त प्रदर्शन केले आहे. त्यांनी 50 षटकांच्या क्रिकेट प्रकारात सर्वाधिक सामने यूएई संघाविरुद्ध खेळले आहेत. मागील 6 वर्षात त्यांनी 15 सामने खेळले आहेत. यातील 9 सामन्यात नेपाळने विजय मिळवला आहे.
स्कॉटलंड आणि नेदरलँडलाही चारलीय पराभवाची धूळ
नेपाळ क्रिकेट (Nepal Cricket) संघाने यूएईव्यतिरिक्त स्कॉटलंड आणि नेदरलँडलाही पराभूत केले आहे. नेदरलँडविरुद्ध नेपाळने 3 सामने खेळताना एक विजय मिळवला आहे. तसेच, स्कॉटलंडविरुद्ध त्यांनी 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत. नेपाळने नामीबिया आणि यूएस संघांनाही पराभवाचं पाणी पाजलं आहे. अशात पाकिस्तान आणि भारतीय संघांनीही नेपाळला हलक्यात घेतले नाही पाहिजे.
आशिया चषक 2023 (Aisa Cup 2023) स्पर्धेत नेपाळ पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळेल. त्यानंतर नेपाळचा दुसरा सामना थेट बलाढ्य भारताविरुद्ध होणार आहे. हा सामना 4 सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या पल्लेकेले येथे पार पडेल.
आशिया चषक 2023साठी नेपाळचा संघ
रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुर्टेल, आसिफ शेख, भीम शर्की, कुशल मल्ला, आरिफ शेख, दीपेंद्र सिंग ऐरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, प्रतीश जीसी, मौसम ढकाल, संदीप जोरा, किशोर महतो आणि अर्जुन सौद. (asia cup 2023 nepal beats uae america namibia netherland and others in previous days read here)
हेही वाचा-
पोरगा टीम इंडियाचा, नव्या दमाचा! गिलपुढे विराटची फिटनेसही पडली फिकी, Yo-Yo Testमध्ये मिळवले ‘एवढे’ गुण
World Cup 2023साठी गांगुलीने निवडला भारताचा ‘दादा’ संघ, ‘या’ मॅचविनर धुरंधरांची हाकालपट्टी; टाका नजर