इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषक 2023चा पहिला सामना खेळला गेला. न्यूझीलंड संघाला विजयासाठी 283 धावांचे लक्ष्य मिळाले असून सलामीवीर डेवॉन कॉनवे याने संघाला अप्रतिम सुरुवात मिळवून दिली. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात डेवॉन कॉनवे याने शतक केले असून चालू विश्वचषक हंगामातील हे पहिलेच शतक ठरले आहे.
डेवॉन कॉनवे (Devon Conway) याने इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात न्यूझीलंडसाठी डावाची सुरुवात केली. सलामीवीर फलंदाज विल यंग (Will Young) गोल्डन डकवर (पहिल्या चेंडूवर शुन्य धावा करून) बाद झाला. पण त्यानंतर आलेल्या रचिन रविंद्र (Rachin Ravindra) आणि कॉनवे यांच्यात मोठी भागीदारी झाली. डेवॉन कॉनवे याने या सामन्यात अवघ्या 83 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
Devon Conway lights up the #CWC23 with a lively hundred in the #ENGvNZ opener ????@mastercard milestones moments????
????: https://t.co/E6RfiDtgIi pic.twitter.com/tknMX3b0y4
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 5, 2023
इंग्लंड प्लेईंग इलेव्हन- जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, जो रूट, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वूड, हॅरी ब्रूक.
न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन- डेवॉन कॉनवे, विल यंग, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, टॉम लॅथम( कर्णधार), ग्लेन फिलिप्स, ट्रेंट बोल्ट, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, रचिन रवींद्र, मॅट हेन्री
(World Cup 2023 EBG vs NZ HUNDRED FOR DEVON CONWAY )
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंडच्या 11फलंदाजांंनी अहमदाबादमध्ये रचला इतिहास! केला 48 वर्षात कोणालाही न जमलेला कारनामा
एकच मारला, पण जबरदस्त मारला! अनुभवी बोल्टच्या चेंडूवर रुटचा नेत्रदीपक रिव्हर्स स्वीप षटकार






