भारतीय संघ तिसऱ्यांदा वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा किताब आपल्या नावावर करण्यासाठी फक्त एक सामना दूर आहे. रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. या सामन्यापूर्वीच भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याने प्लेयर ऑफ द टूर्नामेंटसाठी आपली आवड सांगितली आहे. त्याने आपली आवड सांगत शानदार फॉर्मात असलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनाही झटका दिला आहे.
युवराज सिंग (Yuvraj Singh) याने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची निवड केली आहे. युवराजने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “भारताकडे नेहमीच बेंचवर मॅचविनर राहिले आहेत. मी असे म्हणणार नाही की, हार्दिक पंड्या याची दुखापत चांगली राहिली आहे, पण प्रत्येकाला पाहायचे होते की, शमी कसे प्रदर्शन करतो. ज्याप्रकारे त्याने आपल्या गोलंदाजीने आग ओकली आहे, माझ्या मते, जर कोणी प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा हक्कदार असेल, तर तो मोहम्मद शमी आहे.”
शमीची घातक गोलंदाजी
भारतीय संघाचा घातक वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने विश्वचषक 2023 स्पर्धेत आपल्या कामगिरीने सर्वांच्या बत्त्या गुल केल्या आहेत. त्याने आतापर्यंत फक्त 6 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 9.13 इतक्या जबरदस्त सरासरीने सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. मात्र, हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर शमीला संधी मिळाली. यानंतर शमीने आपल्या घातक गोलंदाजीने विरोधी संघाच्या फलंदाजांना धडकी भरवण्याचं काम केलं.
शमी चालू विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. शमीने या स्पर्धेत अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. शमी विश्वचषकात 50हून जास्त विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे. शमीने न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात 57 धावा खर्चून 7 विकेट्स घेतल्या होत्या. शमी वनडे इतिहासात भारताकडून सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारा गोलंदाजही बनला.
भारताच्या नजरा किताबावर
असे असले, तरीही भारतीय संघाच्या नजरा विश्वचषकाचा तिसरा किताब जिंकण्यावर असेल. भारताने 1983 आणि 2011 वनडे विश्वचषकाचा किताब जिंकला होता. रोहित शर्मा भारताला वनडे विश्वचषक किताब जिंकून देणारा भारताचा तिसरा कर्णधार बनण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. त्याच्यापूर्वी भारताने कपिल देव आणि महेंद्र सिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली किताब जिंकला होता. (world cup 2023 ind vs aus final former cricketer yuvraj singh picks his player of the tournament and its not virat kohli or rohit sharma )
हेही वाचा-
IND vs AUS: Finalपूर्वी शुबमन गिलच्या आजीची आपल्या पतीला ताकीद; म्हणाल्या, ‘एकदा मॅच चालू झाली की…’
चॅम्पियन भारतच! World Cup Final साठी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन्सचीही टीम इंडियाला पसंती