वनडे विश्वचषक 2023चा 21वा सामना रविवारी (22 ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. भारताने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडचे सलामीवीर फलंदाज अपयशी ठरले. मात्र त्यानंतर रचिन रविंद्र आणि डॅरिल मिचेल यांनी डावा सावरला. डॅरिल मिचेल याने वैयक्तिक शतक ठोकले आणि संघाची धावसंख्या 273 पर्यंत पोहोचवली. भारतासाठी मोहम्मद शमी याने विकेट्सचे पंचक घेत जोरदार पुनरागमन केले.
डॅरिल मिचेल या सामन्यात न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 127 चेंडूत 130 धावांची खेळी केली. रचिन रविंद्र यानेही 87 चेंडूत 75 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. दुसरीकडे भारतासाठी मोहम्मद शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शमीने या सामन्यात टाकेलेल्या 10 षटकांमध्ये 54 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव दोन विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड- डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिशेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
महत्वाच्या बातम्या –
मिचेलने सावरला न्यूझीलंडचा डाव! धरमशालेत दिला टीम इंडियाला शतकी घाव
मोठी बातमी! विराटच्या माजी सहकाऱ्याने क्रिकेटला ठोकला रामराम, लगेच वाचा