मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडिअम येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ 2019 विश्वचषक उपांत्य सामन्यात मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी उतरेल. तसेच, या सामन्यात खेळपट्टी मोलाची भूमिका बजावणार आहे. अशात या सामन्यापूर्वी बीसीसीआयवर गंभीर आरोप लावण्यात आला आहे.
वानखेडे स्टेडिअमच्या खेळपट्टीविषयी (Wankhede Stadium Pitch) मोठी बातमी समोर येत आहे. वृत्तांनुसार, भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) उपांत्य सामन्यासाठी ज्या खेळपट्टीची निवड केली होती, त्याजागी दुसऱ्या खेळपट्टीचा (IND vs NZ Pitch Controversy) वापर केला जाणार आहे. यातून भारतीय फिरकीपटूंना फायदा मिळेल. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीचे खेळपट्टी सल्लागार अँडी एटकिन्सन (Andy Atkinson) यांनी भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठी त्या खेळपट्टीची निवड केली होती, जी आतापर्यंत विश्वचषकात वापरली गेली नव्हती. मात्र, आता त्या खेळपट्टीची निवड केली गेली आहे, ज्यावर आतापर्यंत विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील फक्त दोन सामने खेळले गेले आहेत.
TROUBLE AT ICC! 👇
Andy Atkinson, the ICCs independent pitch consultant is frustrated that the pitch for India vs New Zealand semifinal was changed at the last moment.
Can confirm, a leaked email from Atkinson speculated "This is the first ever ICC CWC final to have a pitch… pic.twitter.com/rnJLze7j1Z
— Himanshu Pareek (@Sports_Himanshu) November 15, 2023
रिपोर्ट्समध्ये असे करण्यामागील कारणही सांगितले आहे. ते असे की, भारतीय फिरकीपटूंना जास्त फायदा मिळावा म्हणून खेळपट्टी बदलली आहे. तसेच, खेळपट्टी बदलण्यासाठी व्हॉट्सऍप मेसेज भारतीय आणि आयसीसी अधिकाऱ्यांना पाठवला आहे. मेसेजमध्ये म्हटले गेले आहे की, 7 नंबच्या खेळपट्टीऐवजी 6 नंबरची खेळपट्टी वापरली जाईल. डेली मेलच्या रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले आहे की, आयसीसी खेळपट्टी सल्लागाराला हेदेएखील सांगण्यात आले की, जी खेळपट्टी उपांत्य सामन्यासाठी वापरली जाणार होती, त्यात काही समस्या आहे.
They can't win through fair means, so cowards decided to change the pitch #INDvsNZ pic.twitter.com/GpgJmn75dB
— Hassan (@HassanAbbasian) November 15, 2023
अशात खेळपट्टी बदलल्यामुळे सोशल मीडियावरही तुफान चर्चा रंगली आहे. (world cup 2023 india vs new zealand semifinal mumbai wankhede stadium pitch report)
हेही वाचा-
World Cup Semifinal: वीरेंद्र सेहवागचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला; म्हणाला, ’11 खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी…’
World Cup Semifinal: ‘रोहित न्यूझीलंडविरुद्ध ठरणार…’, माजी खेळाडूची भारतीय कर्णधाराबद्दल मोठी प्रतिक्रिया