वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा महाकुंभमेळा भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ आपापल्या खेळाडूंच्या फिटनेसची काळजी घेत आहेत. न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन सध्या क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल 2023 स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो पुनरागमनासाठी धडपड करत आहे. अशात केन विलियम्सन भारतात वनडे विश्वचषक खेळण्यासाठी येणार की नाही, असा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. त्यावर आता न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी मोठे भाष्य केले आहे.
काय म्हणाले कोच?
केन विलियम्सन (Kane Williamson) याच्या रिकव्हरी आणि पुनरागमनाविषयी संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड (Gary Stead) यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “आम्ही केनच्या फिटनेसची खात्री करण्यासाठी शक्य ते पाऊल उचलू. आम्हाला आवश्यक वैद्यकीय सल्ले मिळाले आणि त्यानुसारच सर्व होत आहे. तो सध्या न्यूझीलंड संघासोबत आहे. नेट्समध्ये सराव करत आहे, पण मैदानावर पुनरागमन करण्यापासून दूर आहे. आम्ही आधी हे ठरवू की, तो विश्वचषकात खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे की नाही. आता काहीही बोलणे घाईचे ठरेल.”
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात दोन खेळाडूंचे पुनरागमन
विशेष म्हणजे, बुधवारी (दि. 09 ऑगस्ट) न्यूझीलंड संघाने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात विलियम्सनला जागा मिळाली नाहीये. मात्र, या मालिकेसाठी स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि काईल जेमिसन यांचे पुनरागमन झाले आहे.
Kane Williamson has not been ruled out of the 2023 World Cup. He's rehabilitating in hope to return to the World Cup. (Espncricinfo). pic.twitter.com/yrmiCqEb96
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 9, 2023
गुडघ्याच्या लिगामेंटची सर्जरी
केन विलियम्सनने अखेरचा सामना आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्सकडून चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळला होता. त्याला स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात सीमारेषेवर झेल पकडण्याच्या प्रयत्नात गुडघ्याची दुखापत झाली होती. विलियम्सनची ही दुखापत खूपच गंभीर होती. त्याच्या उजव्या गुडघ्याची लिगामेंट तुटली होती. यानंतर त्याला सर्जरी करावी लागली होती, जी यशस्वी ठरली. अशात पुन्हा फिटनेस मिळवण्यासाठी कसून मेहनत घेत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, विलियम्सन विश्वचषकात पुनरागमन करू शकतो. (world cup 2023 new zealand coach gary stead react on kane williamson injury)
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्या नाही ‘हा’ खेळाडू होता विजयाचा खरा हिरो; भारतीय दिग्गजाने घेतले हैराण करणारे नाव
पदार्पणवीर तिलकपासून ते कुलदीपपर्यंत, ‘या’ भारतीय खेळाडूंना ICC Rankingमध्ये मोठा फायदा; वाचाचॉ






